एक्स्प्लोर

Rohit Pawar : निवेदन स्वीकारण्यासाठी भाजप शहराध्यक्ष आले आणि रोहित पवार भडकले, नागपुरातील राडा का झाला? 

Rohit Pawar Nagpur Lathicharge : युवा संघर्ष यात्रेच्या समारोपावेळी नागपुरात राडा झाला असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

नागपूर: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला खरं पण त्यासंबंधी निवेदन देण्यावरून मात्र जोरदार राडा  (Rohit Pawar Nagpur Lathicharge ) झाला. आमदार रोहित पवार हे शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नावर सरकारला निवेदन देणार होते, मात्र त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष आले आणि रोहित पवार चांगलेच भडकले. हे सरकार एका आमदाराचे ऐकत नसेल तर सर्वसामांन्यांचे काय ऐकणार असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. 

रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष यात्रेचे कार्यकर्ते आज राज्यातील युवक आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारला निवेदन देणार होते. सरकारने जर जबाबदार व्यक्तीला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवावं अन्यथा आपण विधानभवनवर धडकणार असा इशारा रोहित पवारांनी दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतरही रोहित पवारांचे निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारच्या वतीने भाजपचे शहराध्यक्ष त्या ठिकाणी आले आणि रोहित पवारांचा पारा चढला. 

रोहित पवार भडकले

त्यानंतर आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रेतील कार्यकर्ते हे विधानभवनच्या दिशेने निघाले. त्यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी तीन बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवले. पोलिसांनी यावेळी लाठीचार्ज केला त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. 

त्यानंतर पोलीस रोहित पवारांना ताब्यात घेण्यासाठी आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी रोहित पवारांच्या बाजूने कडे केलं आणि ठिय्या मांडला. त्यानंतर रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "आम्ही युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने 800 किमीचा प्रवास केला. या दरम्यान शेतकरी आणि युवकांनी आम्हाला अनेक प्रश्नांवर निवेदनं दिली. त्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री वा जबाबदार व्यक्तीने यायला हवं होतं, पण यांनी भाजपच्या अध्यक्षाला पाठवलं, हे सरकार अहंकारी आहे." 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या संबंधी सकाळी पत्र दिलं होतं. तसेच अधिकाऱ्यांनाही त्याची माहिती दिली होती, तरीही सरकार बेजबाबदार पद्धतीने वागल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. राज्यातील शेतकरी आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, शिक्षक भरती, पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी हे निवेदन आपण देणार होतो असंही ते म्हणाले. 

आम्ही गरीबांचे प्रतिनिधीत्व करतो, हे सरकार आमदारांचे ऐकत नसेल तर गरीबांचे काय ऐकणार असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला. 

काय म्हणाले रोहित पवार? 

या सरकारला अहंकार आहे. महिलांचे, तरुणांचे, MPSC परीक्षार्थींचे, शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत. याबाबते  निवेदन दिले, हे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करु असं म्हटलं. पण यांना अहंकार आहे. तहसीलदार आणि भाजपच्या अध्यक्षांना आमच्याकडे पाठवत आहेत. मग तुम्हाला काय म्हणायचंय? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत मग तुमची ताकद नाही का? आमदाराचे ऐकत नसतील तर गरिबांचे काय ऐकणार? शेतीचे पंचनामे झालेत का? असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले.

रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात

या सर्व राडेबाजीनंतर पोलिसांनी रोहित पवार यांना ताब्यात घेतलं. रोहित पवारांना ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रोहित पवार यांनी पोलिसांच्या गाडीजवळ ठिय्या मांडला. कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे परिसरात एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं

ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड

दरम्यान, रोहित पवार आणि कार्यकर्त्यांनी पोलिस व्हॅनबाहेर ठिय्या मांडल्यानंतर, पोलिसांनीही बळाचा वापर करण्यास सुरुवात केली.  पोलिसांनी रोहित पवार यांच्याशी चर्चा करुन समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित पवार आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यानंतर मग पोलिसांनी जबरदस्तीने कार्यकर्त्यांना गाडीत बसवलं. यानंतर पोलिसांनी रोहित पवार यांनाही ताब्यात घेऊन गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्या भोवती कडे करुन रोहित पवार यांना ताब्यात घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025Saif Ali Khan Attacked Update : सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोवाल्याने सांगितला घटनेचा थरारSaif Ali Khan Attcked Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 35 पथकांची स्थापना, 20 लोकल तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकंSaif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Embed widget