एक्स्प्लोर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमात रा.स्व.संघाचा इतिहास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रनिर्माणातील योगदान याबद्दल नव्याने माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमात सामील करण्यात आली आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बीएचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामध्ये लक्षवेधी ठरतो आहे नुकताच अभ्यासक्रमात सामील करण्यात आलेला विषय - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र निर्माणात योगदान.
हा नवीन अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून शिकवण्यात येणार असल्याची माहिती आहे. याआधी अभ्यासक्रमात असलेले दोन विषय - नेचर ऑफ मोडरेट पोलिटिक्स आणि राईज अँड ग्रोथ ऑफ कम्युनलिजम - या सत्रापासून वगळण्यात आले असून त्यांच्या जागी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रनिर्माणातील योगदान याबद्दल माहिती नव्याने सामील करण्यात आली आहे.
विद्यापीठात राजकीय पक्षांशी संलग्न संघटना कार्यरत आहेत. नागपूर विद्यापीठात संघ परिवारातील शिक्षण मंचाचे वर्चस्व बघता या बदलाला लगेच राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. मात्र अभ्यासक्रमातील हा एकमेव बदल नाही.
बीएच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती मिळणार असल्याचं समजताच अनेक ठिकाणाहून चर्चा, टीका सुरु झाली आहे. एकीकडे संघाची माहिती सामील केली आहे तर दुसरीकडे भारतीय काँग्रेसच्या सुरुवातीची माहितीही सामील करण्यात आली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमात 2003 पासूनच संघाच्या इतिहासाबद्दल माहिती आहे. मात्र त्याचा मूळ भाग हा कुठेच अभ्यासक्रमात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. हे या बदलांमागील एक महत्त्वाचं कारण असून त्याला राजकीय रंग नाही, असंही मत मांडण्यात आलं आहे.
भाजप सरकार आल्यापासून शिक्षणाच्या भगवीकरणाबद्दल आरोप होत आले आहेत. मात्र इतिहासाच्या कालखंडांकडे बघण्याचे अनेक दृष्टीकोन आहेत, जे वेगवेगळ्या वेळी अभ्यासक्रमात दिसले. त्यातील हा राष्ट्रवादाचा दृष्टीकोन सामील झाला तर त्यात काय चूक? असा उलट सवाल अभ्यास मंडळाचे सदस्य करत आहेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रमात खास विदर्भाच्या किंवा विदर्भात जन्माला आलेल्या संघटनांचा आणि विचारधारेचा समावेश आहे. त्यात शिवाजी शिक्षण संस्था, मातृ सेवा संघ, तपोवन, गुरुदेव सेवा मंडळ, जमनालाल बजाज यांचा ग्राम उत्थानाचा कार्यक्रम, डॉक्टर हेडगेवार आणि संघ, हर्डीकर आणि राष्ट्रीय सेवा दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 1956 मधील धम्म चक्र परिवर्तन हे सर्व अभ्यासक्रमात सामील आहे.
राजकीय विचारधारांनी शैक्षणिक संस्थांवर वर्चस्व ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मात्र तरीही इतिहासात घडलेल्या सर्वच गोष्टी अभ्यासक्रमात असतात, असं नाही. त्यामुळे त्यातील एखादी गोष्ट अभ्यासक्रमात आली, तर त्याला इतिहासात बदल केल्याच्या दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे, की अभ्यासक्रमाच्या, हाही चर्चेचा विषय आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement