एक्स्प्लोर
Advertisement
प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवणार, मतदारसंघाबाबत म्हणतात...
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत. आम्ही 48 उमेदवार उभे करु शकतो, असा विश्वासही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला.
मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत. खुद्द प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात याविषयी माहिती दिली. मात्र कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, हे अद्याप निश्चित नाही.
काँग्रेस संघाला संविधानिक चौकटीत आणण्याचा आराखडा देत नसून तिथे चर्चा अडकल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. काँग्रेस युतीसाठी उत्सुक आहे, असं मी मानत नाही. त्यामुळे ते हा आराखडा देतील असं वाटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
आम्ही 48 उमेदवार उभे करु शकतो, असा विश्वासही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. दरम्यान, आंबेडकरांसाठी काँग्रेसचा चार जागांचा प्रस्ताव आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
मी लोकसभा निवडणूक लढणार हे नक्की आहे. मात्र लक्ष्मण माने यांनी सहीच करणार नाही, असं म्हटल्यामुळे मला आधी तो तिढा सोडवायचा आहे. लक्ष्मण माने यांनी सुशीलकुमार शिंदेंचं ब्लड प्रेशर वाढवायचं ठरवलं आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आता मला नागपूरबाबत विचारत आहात, गडकरींचं ब्लड प्रेशर वाढवायचं कोणी ठरवलं माहिती नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी टोला हाणला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement