कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीकडून नागपुरात पोलीस पत्नीची निर्घृण हत्या
कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने पोलीस पत्नीची तिच्या घरात शिरुन गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
नागपूर : कोरोना व्हायरसमुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची घरात शिरून गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सुशीला मुळे (52 वर्ष) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी नवीन गोटागोडे नावाच्या आरोपीने घरात शिरून सुशीला यांची तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी नवीन गोटाफोडे हा सराईत गुन्हेगार असून तो 28 मार्चपर्यंत तुरुंगात होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याची पॅरोलवर सुटका झाली होती.
नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढवे नगरात राहणाऱ्या 55 वर्षीय सुशीला मुळे यांची राहत्या घरीच निर्घृण हत्या झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नुकताच राज्यातील जेलमधून अनेक कैद्यांना सोडण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे त्यापैकी एकानेच सुशीला मुळे यांची हत्या केली आहे. मृत सुशीला यांचे पती अशोक मुळे हे नागपूर पोलीस दलात कार्यरत असून त्यांची नेमणूक गुन्हे शाखेतच आहे. आज सकाळी अशोक मुळे हे ड्युटी वर गेले होते. तर सुशीला मुळे आणि त्यांचा तरुण मुलगा घरी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच तुरुंगातून पॅरोलवर सुटका झालेला नवीन गोटाफोडे हा मुळे यांच्या घरी आला. तो सुशीला यांच्या मुलाचा लहानपणीचा मित्र असल्याने भेट घ्यायचे आहे, असे बोलला. मात्र, सुशीला यांनी मुलगा झोपला आहे असे सांगून सध्या भेटता येणार नाही असे सांगितले.
कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे
हत्येचे कारण अस्पष्ट नवीन गोटाफोडे तेव्हा तर निघून गेला. मात्र, काही वेळाने तो पुन्हा परतला. स्वयंपाक घरात शिरून धारधार शस्त्राने सुशीला यांच्या गळ्यावर वार केले. हल्ल्यानंतर आरोपीने तिथून पलायन केलं. त्याने ही हत्या का केली हे अजून समजले नसून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नवीन गोटाफोडे हा शुक्रवारीही मृत सुशीला यांच्या मुलाला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळीही सुशीला यांनी त्यांच्या मुलाला भेटू दिले नव्हते. आज सकाळीही त्यांनी नवीनला मुलाला भेटू दिले नाही. आज सकाळी घरी येऊन आरोपी नितीनने सुशीला यांच्या मुलाबद्दल विचारले आणि नंतर हल्ला करून हत्या केली.
लातूरमध्ये आठ मुस्लीम यात्रेकरूंना कोरोनाची लागण; उत्तर भारतातून दक्षिणेकडे सुरू होता प्रवास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कैद्यांची पॅरोलवर सुटका राज्यभरातील विविध मध्यवर्ती व जिल्हा कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तुरुंग प्रशासनाने कच्च्या कैद्यांना तात्पुर्ता जामीन देऊन त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्याने ही हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राज्यभरात असे अनेक कैदी पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आता यावर प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे, महत्वाचे ठरणार आहे.
Special Report | Coronavirus च्या दहशतीत पोलिसांच्या घरी कशी स्थिती आहे? पोलिस पत्नीची आजची स्थिती