एक्स्प्लोर
Advertisement
सगळे नेते बदल्यांसाठी भिडलेत, अशा वागण्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला, नितीन गडकरींनी नेत्यांना झापले
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या नेत्यांना तर शिक्षकांच्या बदल्यांशिवाय दुसरे कामाचं नसल्याचे गडकरी म्हणाले. नेत्यांच्या अशा वागण्यामुळे दुर्दैवाने शिक्षणाचा दर्जा सुधारत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या परखड बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी बदल्यांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना झापले आहे. सध्या सर्व नेते बदल्यांसाठी भिडून आहेत. बदल्या हा नेत्यांचा आवडीचा विषय झाला आहे. याला तिथून फेका, त्याला तिथे घाला. हीच सध्या नेत्यांची कामे आहेत, अया टोला नितीन गडकरी यांनी राजकीय नेत्यांना लगावला आहे. ते नागपुरात आयोजित सरपंच सत्कार सोहळ्यात बोलत होते.
WATCH | जिल्हा परिषद नेत्यांना तर शिक्षकांच्या बदल्यांशिवाय दुसरं कामचं नाही
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या नेत्यांना तर शिक्षकांच्या बदल्यांशिवाय दुसरे कामच नसल्याचे गडकरी म्हणाले. नेत्यांच्या अशा वागण्यामुळे दुर्दैवाने शिक्षणाचा दर्जा सुधारत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. ज्या शहरी शाळांचा निकाल 100 टक्के आहे. त्या नामांकित शाळांवर महापालिका आणि ग्रामीण भागातील जिल्हापरिषद शाळांची जबाबदारी टाकावी, असे ही गडकरी म्हणाले.
WATCH | जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन : गडकरी
याआधी पुण्यात एका कार्यक्रमात त्यांनी जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन, असं वक्तव्य केलं होतं. जातीयवाद, सांप्रदायिकमुक्त, समता आणि एकता या आधारावर समाजाचं संघटन झालं पाहिजे. कोणी छोट्या जातीचा आणि कोणी मोठ्या जातीचा असता कामा नये, असे ते म्हणाले होते. जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही, असेही एका कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले होते.
तर याआधी एका कार्यक्रमात पोकळ स्वप्न दाखवणाऱ्यांना जनता झोडपून काढते, असाही टोला नितीन गडकरी यांनी नेत्यांना लगावला होता. पक्षाचे आमदार-खासदार योग्य काम करत नसतील, तर त्याला सर्वस्वी पक्षाचे अध्यक्ष जबाबदार असल्याचं सूचक वक्तव्य देखील नितीन गडकरींनी केलं होतं.
WATCH | पक्षाध्यक्ष आमदार-खासदारांच्या कामचुकारपणाला जबाबदार | नितीन गडकरी | नवी दिल्ली | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement