एक्स्प्लोर

Nitin Gadkari Property : नेहमी कोट्यावधींच्या पॅकेजची घोषणा करणाऱ्या गडकरींची स्वतःची संपत्ती किती?; पाच वर्षांत 51 टक्क्यांनी वाढ

Nitin Gadkari : निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरी यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला आहे. ज्यात मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Nitin Gadkari Property : मोदी सरकारमध्ये (Modi Government) मागील 10 वर्षात नेहमी कोट्यावधींच्या पॅकेजची घोषणा करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरींची (Nitin Gadkari) चर्चा राहिली आहे. मात्र, स्वतः गडकरी यांची संपत्ती (Property) किती असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. दरम्यान, बुधवारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून (Nagpur Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज भरतांना निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरी यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला आहे. ज्यात मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नितीन गडकरी यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार गडकरी, त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे मिळून एकूण 15.52 कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, एकूण कर्जाची रक्कमदेखील वाढली आहे. 2019 साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे मिळून 10 कोटी 27 लाख 34 हजार 854 रुपयांची संपत्ती होती. तर 2024 मध्ये हा आकडा 15 कोटी 52 लाख 60 हजार 46 इतका झाला. 

गडकरींच्या संपत्तीचा तपशील...

शपथपत्रातील माहितीनुसार गडकरी व त्यांच्या पत्नीकडे 2019 साली 1 कोटी 61 लाख 37 हजार 851 रुपयांची चल संपत्ती होती. 2024 मध्ये हा आकडा 2 कोटी 57 लाख 77 हजार 46 इतका झाला आहे. यात 27 हजार 50 रुपयांची रोकड, 65 लाख 10 हजार 300 रुपयांचे ‘बँक डिपॉझिट्स’, 38 लाख 50 हजार 396 हजार रुपयांची गुंतवणूक,  45 लाख 94 हजार 843 रुपयांची वाहने तर 56 लाख 1 हजार 757 रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. 

गडकरी यांच्या नावे 1 कोटी 32 लाख 90 हजारांची चल संपत्ती

2019 ते 2024 या कालावधीत गडकरी व त्यांच्या पत्नीच्या नावे कुठलीही नवीन अचल संपत्तीची खरेदी झालेली नाही. 2019 साली त्यांच्याकडे 8 कोटी 65 लाख 97 हजार रुपये मूल्याची अचल संपत्ती होती. आता त्याचे मूल्यांकन 12 कोटी 94 लाख 83 हजार इतके आहे. अचल संपत्तीमध्ये 1 कोटी 57 लाख 41 हजारांची धापेवाडा येथे 15 एकर शेतजमीन, वरळी येथील 4 कोटी 95 लाख चालू बाजारमूल्य असलेला फ्लॅट, धापेवाडा येथील 1 कोटी 28 लाख 32 हजारांचे वडिलोपार्जित घर, उपाध्ये मार्ग येथील 5 कोटी 14 लाखांचे घर यांचा समावेश आहे. केवळ नितीन गडकरी यांच्या नावे 1 कोटी 32 लाख 90 हजारांची चल संपत्ती व 4 कोटी 95 लाखांची अचल संपत्ती आहे.

पाच वर्षांत सात मानद पदव्या

दरम्यान, गडकरी यांना 2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत सात मानद पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात चार डी.लिट, एक पीएचडी व दोन डीएस्सी पदव्यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यासाठी या पदव्या त्यांना देण्यात आल्या. गडकरी यांचे शिक्षण बीकॉम व एलएलबी झाले आहे.

दहा न्यायालयीन प्रकरणे

नितीन गडकरी यांनी बुधवारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याआधी गडकरी यांच्याकडून नागपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरी यांनी आपल्यावर दाखल गुन्ह्याची आणि न्यायालयीन प्रकरणाची देखील माहिती दिली आहे. ज्यात गडकरी यांच्याविरोधात विविध प्रकारचे दहा न्यायालयीन खटले सुरू आहेत.

संबंधित बातम्या : 

Vikas Thakre Net Worth : नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या विकास ठाकरेंची संपत्ती किती?; पाच वर्षात तब्बल एवढी वाढ!

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Patil: दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता, शेवटी महानगरपालिका निवडणुका होतील; चंद्रकांतदादांनी सांगितला निवडणूक आयोगाचा प्लॅन
दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता, शेवटी महानगरपालिका निवडणुका होतील; चंद्रकांतदादांनी सांगितला निवडणूक आयोगाचा प्लॅन
Anil Parab On Ramdas Kadam: जो पोरींना नाचवतो, दलालीचे पैसे खातो, त्या नीच माणसाला कोर्टात उघडं Xगडं करायची जबाबदारी माझी; अनिल परबांनी रामदास कदमांची कुंडलीच काढली
जो पोरींना नाचवतो, दलालीचे पैसे खातो, त्या नीच माणसाला कोर्टात उघडं Xगडं करायची जबाबदारी माझी; अनिल परबांनी रामदास कदमांची कुंडलीच काढली
आमिषा पटेल ज्याच्यासोबत एक रात्र घालावयला एका पायावर तयार तोच आता 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत थेट अंतराळात जाऊन लगीनगाठ बांधणार!
आमिषा पटेल ज्याच्यासोबत एक रात्र घालावयला एका पायावर तयार तोच आता 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत थेट अंतराळात जाऊन लगीनगाठ बांधणार!
Tamil actress Sandhya: अभिनेत्रीच्या मृतदेहाचे तुकडे डंपयार्डमध्ये सापडले, डोकं आणि डावा हात सापडलाच नाही; टॅटू ठरला टर्निंग पाँईंट
अभिनेत्रीच्या मृतदेहाचे तुकडे डंपयार्डमध्ये सापडले, डोकं आणि डावा हात सापडलाच नाही; टॅटू ठरला टर्निंग पाँईंट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil: दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता, शेवटी महानगरपालिका निवडणुका होतील; चंद्रकांतदादांनी सांगितला निवडणूक आयोगाचा प्लॅन
दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता, शेवटी महानगरपालिका निवडणुका होतील; चंद्रकांतदादांनी सांगितला निवडणूक आयोगाचा प्लॅन
Anil Parab On Ramdas Kadam: जो पोरींना नाचवतो, दलालीचे पैसे खातो, त्या नीच माणसाला कोर्टात उघडं Xगडं करायची जबाबदारी माझी; अनिल परबांनी रामदास कदमांची कुंडलीच काढली
जो पोरींना नाचवतो, दलालीचे पैसे खातो, त्या नीच माणसाला कोर्टात उघडं Xगडं करायची जबाबदारी माझी; अनिल परबांनी रामदास कदमांची कुंडलीच काढली
आमिषा पटेल ज्याच्यासोबत एक रात्र घालावयला एका पायावर तयार तोच आता 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत थेट अंतराळात जाऊन लगीनगाठ बांधणार!
आमिषा पटेल ज्याच्यासोबत एक रात्र घालावयला एका पायावर तयार तोच आता 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत थेट अंतराळात जाऊन लगीनगाठ बांधणार!
Tamil actress Sandhya: अभिनेत्रीच्या मृतदेहाचे तुकडे डंपयार्डमध्ये सापडले, डोकं आणि डावा हात सापडलाच नाही; टॅटू ठरला टर्निंग पाँईंट
अभिनेत्रीच्या मृतदेहाचे तुकडे डंपयार्डमध्ये सापडले, डोकं आणि डावा हात सापडलाच नाही; टॅटू ठरला टर्निंग पाँईंट
Rashmika Mandanna: शांतीत क्रांती करत रश्मिकानं दसऱ्याच्या धुमधडाक्यात साखरपुडा आटोपला; जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा, लग्नाचा सुद्धा मुहूर्त ठरला!
शांतीत क्रांती करत रश्मिकानं दसऱ्याच्या धुमधडाक्यात साखरपुडा आटोपला; जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा, लग्नाचा सुद्धा मुहूर्त ठरला!
Weather Update: पुन्हा तुफान पावसाची शक्यता, ‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना धोका; अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुन्हा तुफान पावसाची शक्यता, ‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना धोका; अतिमुसळधार पावसाचा इशारा
Nashik wife beating case: नांदायला येत नाही म्हणून बायकोला भर रस्त्यात शिव्यांची लाखोली, केस पकडून बेदम मारहाण, लोक सुद्धा पाहत राहिले; पोलिसांनी शोधून काढत छपरी नवऱ्याची 'जिरवली'
नाशिक : नांदायला येत नाही म्हणून बायकोला भर रस्त्यात शिव्यांची लाखोली, केस पकडून बेदम मारहाण, लोक सुद्धा पाहत राहिले; पोलिसांनी शोधून काढत छपरी नवऱ्याची 'जिरवली'
Amravati Crime: अमरावतीमध्ये क्राईम ब्रांचची मोठी धाड फसली, परतवाड्याच्या ब्राह्मण कॉलनीत हवेत फायरिंग, बिश्नोई गँगच्या शुटरला पकडायला गेले पण...
अमरावतीमध्ये क्राईम ब्रांचची मोठी धाड फसली, परतवाड्याच्या ब्राह्मण कॉलनीत हवेत फायरिंग, बिश्नोई गँगच्या शुटरला पकडायला गेले पण...
Embed widget