Nashik wife beating case: नांदायला येत नाही म्हणून बायकोला भर रस्त्यात शिव्यांची लाखोली, केस पकडून बेदम मारहाण, लोक सुद्धा पाहत राहिले; पोलिसांनी शोधून काढत छपरी नवऱ्याची 'जिरवली'
नाशिकच्या म्हसरूळ परिसरात पत्नी नांदायला येत नसल्यामुळे पती धीरज पवारने भर रस्त्यात पत्नीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.

Nashik Viral Video News: पत्नी घरी नांदायला येत नाही त्यामुळे पतीने भर रस्त्यात पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना नाशिकच्या (Nashik wife beating case) म्हसरूळ परिसरात घडली. अत्यंत तरुण असलेल्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करत असताना लोकही पाहत होते. मात्र, मध्यस्थी करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Nashik viral video) झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत छपरी नवऱ्याची चांगलीच जिरवली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या धीरज पवारला खाक्या दाखवत गुन्हा दाखल केला. व्हायरल व्हिडिओत तरुण तरुणीला मारहाण करत असल्याचे दिसून येत होते. यावरून सोशल मीडियात उलटसूलट चर्चा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत हा वाद पती पत्नीमधील असल्याचे स्पष्ट झाले.
भर रस्त्यात मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल (Nashik social media viral)
धीरज पवार पत्नी नांदण्यास येत नसल्याने भर रस्त्यात जाब विचारत मारहाण करताना व्हिडिओत दिसून येते. केस पकडून बेदम मारहाण करत असून नागरिक बघ्याची भूमिका घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. धीरज पवारविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या दणक्यानंतर पत्नीला मारहाण करणाऱ्या धीरजने आपला गुन्हा कबूल करत हात जोडून माफी मागितली. नाशिक शहरात गुन्हेगारी वाढत असल्यानं पोलीस टीकेचे धनी होत असतानाच मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तरुणाने मारहाण केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनेचा खुलासा केला.
चार जणांनी युवकाला संपवलं (Nashik Crime)
दरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या (Nashik Police Station) हद्दीत गोरेवाडी परिसरात एका 24 वर्षीय युवकाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. 2) घडली. कृष्णा दीपक ठाकरे असे मृत युवकाचे नाव आहे. कृष्णावर तिघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कृष्णा गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने कृष्णा याला बिटको रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
इतर महत्वाच्या बातम्या























