एक्स्प्लोर
Advertisement
नक्षलींचं नेतृत्वबदल, गणपतीऐवजी खतरनाक बसवराजकडे सूत्रं
72 वर्षीय मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपतीच्या हातातली सूत्रं आता नक्षली फळीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बसवराजकडे आली आहेत.
नागपूर : एकीकडे देशासमोर नक्षलवादाचा प्रश्न गंभीर होत असताना नक्षलींनी आपली ताकद आणखी वाढवली आहे. नक्षलींनी आपलं नेतृत्व बदलल्याची माहिती समोर येत आहे. आता खतरनाक बसवराज हा नक्षलींचा नवा सूत्रधार आहे.
नक्षलींचा म्होरक्या.... 72 वर्षीय मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपतीच्या हातातली सूत्रं आता नक्षली फळीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बसवराजकडे आली आहेत. सामूहिक निर्णय घेऊनच नक्षलींनी सूत्रबदल केल्याची माहिती मिळते.
जंगलातला, युद्धभूमीचा जोर कमी पडू लागला. महाराष्ट्रात 40 माओवादी मारले गेले. अनेक ठिकाणी जोर कमी झाला. आत्मसमर्पणाचा जोर वाढला, पैशाचे मार्ग बंद झाले आणि शहरी बुरखाही फाटला. नक्षलींच्या श्वासनलिका असलेले साईबाबा आणि रोना विल्सन हे गजाआड झाले
गणपती नक्षली विचारांचा आहे, पण बसवराज थेट जंगलात युद्ध करणारा, जास्त आक्रमक आणि खुंखार. 63 वर्षीय नंबाला केशव राव उर्फ बसवराज हा मूळचा आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्याचा. वारंगलच्या रिजनल इंजिनियरिंग म्हणजेच आत्ताच्या एनआयटीचा पदवीधर. नक्षलींच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनचा मुख्य. छुपी युद्धनीती आणि एक्सप्लोझिव्हचं कौशल्य. आंध्र प्रदेशातील दोन आमदारांना मारल्याचे ऑपरेशन हे बसवराज पॅटर्न म्हणून ओळखले जाते.
गणपतीच्या जागी आता बसवराजला आणण्याची कारणे बघता नक्षलींचा पुढचा मार्ग हा अधिक हिंसक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement