एक्स्प्लोर

Nagpur Fire : नागपूरमधील महाकाली नगरमध्ये भीषण आग; गॅस सिलेंडरच्या स्फोटाने आग लागल्याची शक्यता

Nagpur Fire : नागपूरमधील महाकाली नगरमध्ये भीषण आग लागली आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचे म्हटले जात आहे.

Nagpur Fire : नागपूरमधील महाकाली नगरमध्ये आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. दोन तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले नाही. या आगीत काही झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. 

महाकाली नगरमध्ये सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली. स्फोटानंतर लागलेली आग वेगाने फैलावू लागली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी 6 ते 7 वेळेस स्फोटाचे आवाज ऐकू आले.  आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या असून पाण्याचे टँकरही पोहचले आहेत. मात्र झोपडपट्टी मोठी आहे. त्याशिवाय अरुंद गल्ल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला आग लागलेल्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती आहे. अनेक अडथळ्यांवर मात करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. त्याशिवाय, स्थानिक नागरिकांकडून आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

खूप मोठ्या प्रमाणावर स्फोट झाल्यामुळे महाकाली नगर मधील अनेक कुटुंबांनी त्यांच्या घरातील महत्त्वाचे साहित्य तसेच घरगुती गॅस सिलिंडरसह सुरक्षित स्थळी धाव घेतली आहे. सध्या स्थानिक नागरिक आपल्या घरगुती साहित्यासह महाकाली नगरजवळच्या मोकळ्या मैदानावर आश्रय घेऊन आहेत. घटनास्थळी पोलिसांचा ताफा कमी असल्याने स्थानिक तरुणांचा धुडगूस सुरू आहे.,

वार्तांकन करणाऱ्या एबीपी माझाच्या टीमवर हल्ला

महाकाली नगर मध्ये लागलेल्या आगीचे वार्तांकन करणाऱ्या एबीपी माझाच्या चमूवर काही स्थानिक तरुणांनी हल्ला केला. एबीपी माझाचे कॅमेरामॅन अतुल हिरडे यांना खाली पाडून त्यांच्या हातातला कॅमेरा खाली पाडण्यात आला. अतुल हिरडे यांना किरकोळ मार लागला असून ते सुरक्षित आहेत. तर कॅमेऱ्याचे नुकसान झाले आहे. एबीपी माझाशिवाय आणखी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर काहींनी हल्ला केला असल्याचे वृत्त आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच मध्य प्रदेशात हादरवणारं दृश्य, आढळले 5 मृतदेह
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच घरात आढळले लटकलेले संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह
Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Telly Masala : टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
OTT Release Week :  जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve : लोकशाहीचा गळा सातत्याने घोटला जातोयKolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूकVidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 :  ABP MajhaDeekshabhoomi Nagpur :  नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच मध्य प्रदेशात हादरवणारं दृश्य, आढळले 5 मृतदेह
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच घरात आढळले लटकलेले संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह
Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Telly Masala : टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
OTT Release Week :  जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज
Babn Gite: लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Embed widget