Nagpur District Gram Panchayat Election Result Live Update : नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिकवर
Nagpur District Gram Panchayat Election Results 2022 Live Updates : नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणीला सकाळी दहापासून सुरु झाली आहे.
LIVE
Background
Nagpur Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतचा सहभाग आहे. प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कार्यालयात मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीला दहा वाजता सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीणमधील माहूरझरी व नरखेड तालुक्यातील अंबाडा देशमुख ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे. मात्र या संदर्भातील अधिकृत निकाल आयोगाकडून अद्याप घोषित व्हायचा आहे. ग्रामपंचायतची मतमोजणी संपल्यानंतर सर्व तहसील मधील अधिकृत माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे रात्री उशिरा मिळेल. यासंदर्भातील माहिती वेळोवेळी आपल्याला दिली जाईल...
नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींपैकी 98 वर भाजपचा झेंडा, कॉंग्रेसच्या ताब्यात 90 ग्रामपंचायतीं
Nagpur District Gram Panchayat Election Result Live Update : प्राप्त आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींपैकी 98 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला तर 90 ग्रामपंचायती कॉंग्रेसने काबिज केल्या आहेत. या निवडणूकीत शिंदे गटाला आठ ग्रामपंचायती मिळाल्या तर उद्धव ठाकरे गटाला केवळ दोन ग्रामपंचायतींवर समाधान मानावा लागला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खात्यात बावीस ग्रामपंचायती गेल्या तर अपक्ष आणि इतरांनी सोळा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.
Nagpur : हिंगणा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींपैकी पाच भाजपच्या
Gram Panchayat Election Results 2022 : हिंगणा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतीं भाजपला मिळाल्या आहेत. तर दोन ग्रामपंचायती राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाल्या आहेत.
Nagpur : उमरेड तालुक्यातील 7 पैकी पाच ग्रामपंचातींवर कॉंग्रेसचा झेंडा
Gram Panchayat Election Results 2022 : उमरेड तालुक्यातील 7 ग्रामपंचायत मध्ये कॉंग्रेसला पाच, भाजपला एक आणि उद्धव ठाकरे शिवसेनेला एक जागा मिळाली आहे.
Nagpur : कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायतींचे निकाल...
Gram Panchayat Election Results 2022 : कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायतींचे निकाल हाती. सोळा जागांवर भाजप तर एक जागेवर कॉंग्रेसचा विजय.
Nagpur : काटोल विधानसभा क्षेत्रात 51 पैकी 34 ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच
Gram Panchayat Election Results 2022 : काटोल विधानसभा क्षेत्रात 51 पैकी 34 ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच विजयी झाल्याची माहिती आहे. तसेच मसोद व झिल्पा येथील ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचा उपसरपंच होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळविलेल्या ग्रामपंचायतींमध्ये घुबडी, सिंगारखेडा, आग्रा, आरंभी, जामगाव, खेडी, चिखली, दावसा, गोंडीदिग्रस, वंडली सावरकर, येरला धोटे, ईसापूर खु., पिंपळगाव राउत, मेंढला, थुगाव निपाणी, तिनखेडा, मसोरा, सिंदी, सावंगा, वडेगाव उमरी, राउळगाव, वडविहीरा, आजनगाव, माहुरखोरा, लोहारी सावंगा, कोंढाळसावळी, गरमसुर, खामली, राजनी, मेंडकी, अंबाडा सोनक, वंडली वाघ आदींचा समावेश आहे.