नागपूर : शहरात एक डिसेंबरपासून कोविड लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीचा पहिला डोस पैसे देऊन मिळणार. नागपूर शहरात अजूनही दोन लाख 70 हजार नागरिकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. याच लोकांमुळे कोरोनाची साथ पुन्हा पसरणार नाही ना अशी पालिकेला भीती वाटत आहे. 

Continues below advertisement

नागपूर महानगर पालिका हद्दीत 19 लाख 63 हजार इतकी लोकसंख्या ही 18 वर्षावरील आहे. त्यापैकी 16 लाख 92 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. उर्वरित दोन लाख 70 हजार नागरिक अद्यापही लसीकरण केंद्रांकडे फिरकलेले नाहीत. हेच दोन लाख 70 हजार नागरिक नागपुरात तिसर्‍या लाटेचा कारण तर ठरणार नाही ना अशी भीती महापालिकेला आहे.

तसेच तिसरी लाट पसरल्यास लस न घेतलेले हेच दोन लाख 70 हजार लोक संक्रमणाबद्दल सर्वाधिक धोक्यात असतील अशी शंका महापालिकेला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला टाळण्यासाठी या दोन लाख 70 हजार नागरिकांना लस देणे गरजेचे आहे हे ओळखूनच महापालिकेने 30 नोव्हेंबर पर्यंत या नागरिकांना लस लावण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तसेच एक डिसेंबर नंतर लसीचा पहिला डोस घ्यायला येणाऱ्या कडून पैसे घेतले जाईल असेही महापालिकेने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे लस न घेणाऱ्या दोन लाख 70 हजार नागरिकांमध्ये काही विशिष्ट समाजातील नागरिक जास्त आहेत. त्यांच्या धर्मगुरूंच्या माध्यमातून महापालिका जनजागृती करून त्यांना लस घेण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न करत आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या :