Nagpur Police : पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीत मोठा फेरबदल; फटांगरे अजनी, वर्टिकर हुडकेश्वरचे नवीन ठाणेदार
दीर्घ काळापासून साईड पोस्टिंगवर काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना या बदल्यांमध्ये ठाणेदारीची संधी आली आहे. अचानक झालेल्या फेरबदलामुळे पोलीस विभागात विविध चर्चांना उधाण आले आहे.
Nagpur News : पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी शहरातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात काहींना अस्थायीरित्या ठाणेदारी देण्यात आली. अचानक झालेल्या फेरबदलामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. सायबर पोलिस (Cyber Police Station) ठाण्याचे नितीन फटांगरे यांना अजनीचा नवीन ठाणेदार नियुक्त करण्यात आले. तसेच दीर्घ काळापासून साईड पोस्टिंगवर काम करणाऱ्या ललित वर्टिकर यांना हुडकेश्वरचा नवीन ठाणेदार नियुक्त करण्यात आले आहे.
हुडकेश्वरच्या पोलिस निरीक्षक (PI) कविता इसारकर यांना कपिलनगर, वाहतूक विभागाचे सुहास चौधरी यांना वाठोडाचा ठाणेदार बनविण्यात आले. गणेशपेठच्या भारत क्षीरसागर यांना नवीन कामठी पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली. राणाप्रतापनगरच्या दीपक भिताडे यांना जुनी कामठी, ईओडब्ल्यूच्या अनिरुद्ध पुरींना तहसील, पाचपावलीचे दुय्यम पोलिस निरीक्षक रवी नागोसे यांना कोराडी (Koradi) आणि सक्करदराचे दुय्यम पोलिस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांना गणेशपेठचे ठाणेदार नियुक्त करण्यात आले. नवीन कामठीचे संतोष वैरागडे यांना पोलिस आयुक्तांचा रिडर नियुक्त करण्यात आले. कपिलनगरचे अमोल देशमुख, वाठोडाच्या आशालता खापरे, कपिलनगरच्या दुय्यम पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे, अजनीचे दुय्यम पोलिस निरीक्षक महेश सागळे, कोराडीचे दुय्यम पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, अजनीचे सारीन दुर्गे आणि जुनी कामठीचे राहुल शिरे यांना गुन्हे शाखेत पाठविण्यात आले आहे. कोराडीचे कृष्णचंद्र शिंदे आणि इमामवाडाचे दुय्यम पोलिस निरीक्षक रवींद्र नाईकवाडे यांना ईओडब्ल्यूमध्ये (EOW) पाठविण्यात आले आहे.
सदरचे (Sadar PS) दुय्यम पोलिस निरीक्षक अजय आखरे यांना नंदनवन, हुडकेश्वरच्या चित्तरंजन चांदुरे यांना मानकापूर, ईओडब्ल्यूचे देवेंद्र ठाकूर यांना पाचपावली, विक्रांत सगणे यांना हुडकेश्वर, प्रमोद पोरे यांना सीताबर्डी, मुकुंदा कवाडे यांना एमआयडीसी आणि गोकुळ सूर्यवंशी यांना सदरचे दुय्यम पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले. तसेच गुन्हे शाखेचे नितीन पतंगे यांना सक्करदरा आणि हरीशकुमार बोराडे यांना प्रतापनगर ठाण्यात दुय्यम पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले. गुन्हे शाखेचे मुकुंदा साळुंके यांना वाहतूक, पांडुरंग सोनवणे यांना विशेष शाखा तर नामदेव गांजुर्डे यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले. सीताबर्डीचे दुय्यम पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांना सायबर पोलिस ठाण्याचा प्रभारी बनविण्यात आले, तर तहसीलच्या ठाणेदार तृप्ती सोनवणे यांना विशेष शाखेत पाठविण्यात आले. मानव संसाधन विभागाच्या विद्या जाधव यांना वाहतूक शाखेत (Nagpur Police Traffic Branch) पाठविण्यात आले.
ही बातमी देखील वाचा