एक्स्प्लोर
नागपुरात 'बिग बी' थांबलेल्या हॉटेलमधील नाश्त्यात अळ्या
14 आणि 15 डिसेंबर रोजी आयपीसीए फार्मा या कंपनीची या हॉटेलमध्ये मीटिंग होती. त्यावेळी देण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये अळ्या आढल्याने फार्मा कंपनीने हॉटेल प्रशासनाला कळविले होते.
नागपूर : नागपूरमधील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये नाश्त्यात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. रेडिसन ब्ल्यू या सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये इडली सांबरमध्ये अळी आढळल्याचा प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे याच हॉटेलमध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे थांबले आहेत. झुंड सिनेमाच्या चित्रीकरणासाठी नागपुरात आल्याने त्यांचा मुक्काम सध्या इथेच आहे.
14 आणि 15 डिसेंबर रोजी आयपीसीए फार्मा या कंपनीची या हॉटेलमध्ये मीटिंग होती. त्यावेळी देण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये अळ्या आढल्याने फार्मा कंपनीने हॉटेल प्रशासनाला कळविले होते.
दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर युवासेनेने काल एफडीएकडे तक्रार दिली आहे. काल रात्री एफडीएच्या चमूने हॉटेलमध्ये जाऊन चौकशी करत तिथल्या खाद्यपदार्थाचे नमुने घेतले आहेत. आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एफडीएचा अहवाल आल्यानंतर यातील सत्यता समोर येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement