RTMNU : विद्यापीठावर संस्थाचलाकांचा हल्लाबोल, फीवाढीला स्थगितीचा निषेध
दबावाला बळी पडून कुलगुरू व प्राधिकरणाने मनमानीने 8 सप्टेंबरला अधिसूचना काढून शुल्क वाढीला स्थगिती दिली असल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. निर्णय फिरविणे महाविद्यालये व संस्थांवर अन्याय आहे.
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (RTMNU) 9 वर्षांनंतर महाविद्यालयीन फी 20 टक्के वाढविली. त्यानंतर मात्र शुल्कवाढीला स्थगिती दिली गेली. यामुळे महाविद्यालयीन संस्थाचालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. संस्थाचालकांनी अमरावती मार्गावरील बजाज भवनावर हल्लाबोल करीत फीवाढ मागे घेण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. काही संस्थांच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
कुलगुरूंच्या (VC) कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. त्यानंतर नागपुर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना संस्थाचालक महासंघातर्फे मागणीचे निवेदन देण्यात आले. प्र- कुलगुरू डॉ.संजय दुधे यावेळी उपस्थित होते. संस्थाचालकांच्या (private colleges) मागण्यावर सकारात्मक विचार करून, व्यवस्थापन परीषदेमध्ये हा विषय ठेवून निर्णय घेण्यात येईल, पुढील काळात शुल्कवाढीवरील स्थगिती हटविली जाईल, असे आश्वासन डॉ. चौधरी यांनी दिले. आंदोलनात विद्यापीठ महाविद्यालयीन संस्थाचालक महासंघाचे समन्वयक प्रा. दिवाकर गमे, संपर्क प्रमुख प्रा. मारोती वाघ, अंतू भिवगडे, राजेश भोयर, संजय धनवटे, संदिप काळे, पांडुरंग तुळसकर, प्रविण कडू, सारिका चौधरी, उमेश तुळसकर, बलराज लोहवे, राजेश गोयल, एम. जी. बोरकर, ओ. बी. चौधरी, सुनील शिंदे, डी. डी. कामडी, सोमेश्वर चोपकर, प्रवीण भांगे, उदय टेकाडे, सचिन बोंगावार, प्रा. विजय टेकाडे, सतिश भोयर आदींचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना सुविधा द्यायच्या कशा?
शासकीय नियम व उच्च न्यायालयाचे निर्णय, तसेच वाढती महागाई, कर्मचाऱ्यांचे वाढणारे वेतन लक्षात घेता शुल्क वाढ समर्थनियच होती. पण, काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाचे कुलगुरू, तसेच प्राधिकरणाच्या सभेत घुसून दबाव व दशहत निर्माण करून, ही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली. दबावाला बळी पडून कुलगुरू व प्राधिकरणाने मनमानी पद्धतीने 8 सप्टेंबरला अधिसूचना काढून शुल्क वाढीला स्थगिती दिली असल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे निर्णय फिरविणे महाविद्यालये व संस्थांवर अन्याय आहे. शासन नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावे, हा प्रश्र्न अनेक महाविद्यालयांसमोर (colleges) निर्माण झाला असल्याचे संस्थाचालकांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nagpur Crime : तरुणीची फसवणूक पडली महागात, जिल्हा व सत्र न्यायालयानंतर हायकोर्टानेही फेटाळला अर्ज
Impact Player Rule : आता आयपीएलमध्ये 11 नाही, तर 15 खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार संघ, बीसीसीआय नवा नियम लागू करण्याच्या तयारीत, वाचा सविस्तर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI