एक्स्प्लोर

Ajay Sood : भारत लवकरच 'कॉन्टेम मिशन' सुरू करणार ; पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. सूद यांची माहिती

राष्ट्रीय रिसर्च फाऊंडेशन तयार करण्यात आले पूर्वी राज्यातील विद्यापीठांचा त्यात समावेश नव्हता. मात्र, आता त्यात राज्यातील विद्यापीठाचा समावेश करण्यात आल्याचे सूद यांनी सांगितले.

Indian Science Congress Nagpur : देशात लवकरच 'कॉन्टेम मिशन'ची (quantum mission) घोषणा करण्यात येणार असून याची संपूर्ण तयारी झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच याची सुरुवात होणार होती. मात्र कोविडमुळे याला विलंब झाला होता. मात्र आता तयारी पूर्ण झाली असून याची घोषणा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकरचे वैज्ञानिक सल्लागार प्रो. अजय सूद (Ajay Sood) यांनी सांगितले. 108 व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या पहिल्या सत्रात त्यांनी व्याख्यान दिले, त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
 
प्रो. सूद म्हणाले, सध्या सेमीकंडक्टरची जगभरात मोठी मागणी आहे. 50 वर्षांपूर्वी आपण सेमीकंडक्टर मिशन सुरू करण्याची संधी भारताने गमावली. त्यामुळे सेमीकंडक्टर उत्पादन आणि पुरवठा करण्यात चीन पुढे आहे. मात्र, आता 'कॉन्टेम मिशन' सुरू करण्याची खरी वेळ आली आहे. त्यामुळे ही संधी गमवायची नसल्याने त्यावर सरकारने पावले उचलली असून याची सुरुवात करण्यात येणार आहे.

'कॉन्टेम मिशन'बद्दल बोलताना सूद म्हणाले...

'कॉन्टेम मिशन'मध्ये चार घटक आहेत. त्यात कम्युनिकेशन, काॅम्प्युटेशन, सेंसर आणि मटेरिअल चा समावेश आहे. यापैकी कम्युनिकेशन हा घटक सध्या अतिशय प्रगतीपथावर आहे. पूर्वी कम्युनिकेशनमधील पारंपरिक पद्धतीने सिग्नल जायचे. मात्र, आता सिग्नल 'कॉन्टेम' पद्धतीने जाईल. अशाच प्रकारे इतरही घटक काम करणार आहेत. यावेळी जीएम क्रॉपवर बोलताना ते म्हणाले की, अनेकजण हा प्रश्न भावनिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, विदेशातून येणाऱ्या खाद्य तेलामध्येही जीएम क्रॉपचा वापर करण्यात येतो. त्यामुळे देशातील जीएम क्रॉपबाबत विरोध करण्याला अर्थ नसल्याचे ते म्हणाले. यावेळी पेटंटबाबतच्या प्रश्नावर ते घेऊन अर्थ नसून त्यावर काम करण्यासाठी प्रयत्न व्हावा असे त्यांनी सांगितले. पेटंट घेतल्यावर त्याचा उपयोग न झाल्यास त्याचे फेरनोंदणी करावी लागते. त्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे पेटंट घेण्यापेक्षा त्या संशोधनाचे फायदे प्रत्यक्षात जमिनीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

आकडेवारीचे शिकार होऊ नका

जगभरात अनेक अहवाल येत असतात. ते आकडेवारीचे शिकार असतात. त्यातील आकडेवारी ती तथ्याला अनुसरुन नसते. एका अहवालात भारतात मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन होत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती तशी नसून भारत तुलनेत कमी उत्सर्जन होत आहे. मात्र, भारत त्यासाठीही स्वतःहून काम करीत असल्याचे ते म्हणाले. 

राष्ट्रीय रिसर्च फाऊंडेशनमुळे संशोधनाला चालना...

विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत असते. त्यासाठी राष्ट्रीय रिसर्च फाऊंडेशन (National Research Foundation) तयार करण्यात आले असून त्यामाध्यमातून अशा संशोधनासाठी निधी देण्यात येते. यापूर्वी राज्यातील विद्यापीठांचा त्यात समावेश नव्हता. मात्र, आता त्यात राज्यातील विद्यापीठाचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ही बातमी देखील वाचा...

इस्त्रोची माहिती देणारी गाडी 'स्पेस ऑन व्हिल्स' ; इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Embed widget