एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2022 : गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन

सार्वजनिक गणेश मंडळांनी आधार आणि मतदार कार्ड लिंक करण्याच्या उपक्रमात सहभागी व्हावे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंडळाला निवडणूक विभागाकडून बक्षीसे जाहीर करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

नागपूर :  यंदा गणेशोत्सवावर कुठलेही निर्बंध नसले तरी नागरिकांनी घरातील गणेश मूर्ती तसेच मंडळांनी आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन कुत्रीम तलाव, किंवा टँकमध्येच करावे. पर्यावरणपुरक गणेश मूर्तीची स्थापना करावी. तसेच गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह शांततामय वातावरणात उत्सव साजरा होण्यासाठी नागरिकांनी महसूल व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मीनल कळसकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, पोलीस उप अधीक्षक (गृह) संजय पुरंदरे यावेळी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठकीला उपस्थित होते.

कृत्रिम तलावात करा विसर्जन

डॉ. इटनकर म्हणाले, गणेशोत्सव काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी महसूल व पोलीस विभागाने सार्वजनिक गणेश मंडळ तसेच गणेश विर्सजनाच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात. विर्सजनाच्या ठिकाणी स्वच्छता, निर्माल्य विर्सजन, लाईटची व्यवस्था, बॅरिकेट्स, स्वयंसेवक आदी बाबींचे नियोजन करण्यात यावे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या गणपती मुर्तींना नैसर्गिक पाण्याच्या नदी-तलावसाख्या स्त्रोतांमध्ये विर्सजित करण्यात येवू नये. घरगुती गणपती तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणपतींना कृत्रिम तलाव किंवा घरगुती टँकमध्ये विर्सजित करण्यात यावे. तालुकास्तरावर नगरपरिषद व महसूल विभागाने पडीक जमीन तसेच बंद झालेल्या खाणी याठिकाणांची माहिती गोळा करुन कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी नियोजन करावे. विर्सजनाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सोयी-सुविधा उभारण्यात याव्यात. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक नियमांनुसार कारवाया कराव्या. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी व गर्दीच्या व्यवस्थापनासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. शांततामय वातावरणात उत्सव साजरा होण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. इटनकर यांनी केले.

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड संलग्न करा

प्रत्येक नागरिकाची ओळख स्पष्ट होण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राला आधार कार्ड संलग्न करण्याचा उपक्रम आखला आहे. त्यानुसार नागरिकांनी फॉर्म नंबर-6 ब भरुन निवडणूक विभागाव्दारे नियुक्त मतदान केंद्र अधिकारी यांना सादर करावे. यासाठी निवडणूक विभागाकडून 'व्होटर हेल्पलाईन ॲप' विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडता येईल. या ॲपचा उपयोग करणे अगदी सोपे असून नागरिकांनी त्याव्दारे आधारकार्ड जोडून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाच्या या उपक्रमात सहभाग घेऊन गणपती दर्शनाला येणाऱ्या भक्तांना याचा लाभ करुन द्यावा. या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळाला निवडणूक विभागाकडून बक्षीसे जाहीर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget