एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: निराश होऊ नका, मी 3 महिन्यांत आपलं सरकार आणतो, देवेंद्र फडणवीसांचा भाजप कार्यकर्त्यांना शब्द

Maharashtra Politics: माझं नाव सध्या फार लाडकं झालं जो तो घेतो, अनिल देशमुखांवर बोलणं मी माझा कमी पणा समजतो, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरील गंभीर आरोपांना प्रत्युत्तर दिले. नागपूरच्या लोकांना सत्य परिस्थिती सांगण्यासाठी मी बोलतोय.

नागपूर: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही निराश होऊ नका, मी 3 महिन्यांत महाराष्ट्रात आपली सत्ता आणतो, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले. ते रविवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे (Mahayuti Alliance) सरकार आणण्याचा विश्वास व्यक्त केला. 

आपला प्रॉब्लेम झाला तो म्हणजे 2014 नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली.  त्यामुळे एक निवडणूक हरली तरी कार्यकर्ते खचतात, निराश होतात. पण कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे वागणे सोडावे,  आता मी तीन महिन्यात आपलं सरकार आणतो.  आपली लढाई रयतेचा राज्य आणण्यासाठी आहे. त्यासाठी तुम्ही ताकदीने मैदानात उतरा,  सहाही जागा आपल्या महायुतीच्या येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील झालेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा पाढाही वाचला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आणली. त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. नागपूर जिल्ह्यात विकासाची गंगा गडकरी साहेबांच्या (Nitin Gadkari) माध्यमातून आम्ही आणली. नळ गंगा योजना आम्ही आणली, त्याला पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल. मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आपण विदर्भात आणली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. 

देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना

लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत काम करण्याचा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्यांनी म्हटले की, आपले कार्यकर्ते काम चांगले करतात. मात्र, विरोधकांप्रमाणे आपण मार्केटिंग करत नाही,आता आपली काम तुम्ही दाखवा. हे लोक एवढे हुशार आहे ते निवडणुकीपुरत्या घोषणा करतात, मार्केटिंग करतात. त्यामुळे आता तुम्हीदेखील आपलं मार्केटिंग करा, आपले काम जनतेला दाखवा. अनेक कार्यकर्ते थकले होते , चालते तर चालू द्या, अशा मनोवृत्तीने काम करत होते. अनेक चमकेश कार्यकर्ते आपल्याकडे आहेत, ते कॅमेरा पाहून काम करतात ते आता विसरा, अशी तंबीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आणखी वाचा

माझं नाव सध्या फार लाडकं झालं जो तो घेतो, अनिल देशमुखांवर बोलणं मी माझा कमी पणा समजतो : देवेंद्र फडणवीस

'फडणवीस मैदानात उतरले तर मविआतील सर्वांचं वस्त्रहरण होईल', सचिन वाझेंच्या आरोपानंतर नितेश राणेंचा इशारा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
Embed widget