एक्स्प्लोर

DRDO: बॉम्ब निकामी करण्यासाठी डीआरडीओचा 'दक्ष' सज्ज ; विद्यार्थ्यांसाठी ठरत आहे विशेष आकर्षण

'दक्ष'मधील रोबोटिक तंत्रज्ञानामुळे 2 किलोमीटर अंतरावरून ऑपरेट करता येईल. त्यामुळे मानवी हानीची शक्यता नसल्यासारखी आहे. विशेष म्हणजे जेसीबीच्या आकाराच्या असलेल्या या उपकरणाला 11 कॅमेरे लागले आहेत.

Indian Science Congress News : युद्धजन्य परिस्थितीमध्ये शत्रूंकडून बॉम्ब लावून सेनेचं नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच बॉम्ब निकामी करताना मोठ्या प्रमाणात जीवहानी होण्याची शक्यता असते. अशावेळी दोन किलोमीटर दूर बसून कुठल्याही जीवितहानीशिवाय ते निकामी करण्याचे तंत्रज्ञान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (Defence Research and Development Organisation) विकसित करण्यात आले आहे. 'दक्ष' (UXOR) असे या रोबोटचे नाव आहे. इंडियन सायन्स कॉंग्रेसमधील प्राईड ऑफ इंडिया या DRDO च्या डोम बाहेर हे रोबोट विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे.

या रोबोटद्वारे तब्बल एक हजार किलो विस्फोटक निकामी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान लवकरच वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. विदेशी सैन्याशी लढत असताना अनेकदा सीमेवर लॅन्ड माइन्स ( Land Mines) आणि इतर स्फोटके पेरण्यात येतात. अशावेळी आपल्या सैन्यासाठी ते घातक ठरतात. अशा स्फोटकांना निकामी करण्यासाठी अनेकदा मानवी यंत्रणा कमी पडते. त्यामुळे वायुसेनेमार्फत (Air Force) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडिओ) एक टास्क देण्यात आला होता. त्यातून 'दक्ष' (UXOR)ची निर्मिती करण्यात आली आहे.

जवळपास एक हजार किलो विस्फोटके निकामी करता येणे सहज शक्य होते. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे हे दोन किलोमीटर अंतरावरून सहजरीत्या वापरता येत असल्याने मानवी हानीची शक्यता जवळपास नसल्यासारखी आहे. विशेष म्हणजे जेसीबीच्या आकाराच्या असलेल्या या उपकरणाला 11 कॅमेरे लागले आहेत. त्यांतून परिसरातील इत्यंभूत माहिती घेता येणे सहज शक्य होते. दोन आर्म हे समोर येणारा प्रत्येक अडथळा पार करण्यासाठी मदतीचे ठरतात. त्यामुळे येणाऱ्या काळात ते केवळ वायुसेनेलाच नव्हे तर स्थल सेनेलाही अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (डीआरडिओ) विकसित करण्यात आलेले दक्ष अद्ययावत तंत्रज्ञान आता वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यासाठी वायुसेनेद्वारे टास्क देण्यात आले होते. त्यामुळे स्फोटके निकामी करण्यात ते अतिशय मदतगार ठरणारे असल्याची माहिती डीआरडिओ डिझाईन टीमच्या कथीका रॉय यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कॉम्पसमध्ये आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या नागपुरात सुरू असलेल्या कार्यक्रमात दिली. 

ही बातमी देखील वाचा...

गुळभट्टी होणार 80 टक्के धुरमुक्त, प्लास्टिक पासून तयार केले डिझेल ; केंद्राच्या कौन्सिल ऑफ सायटिफिक अॅन्ड इडस्ट्रीअल रिसर्चचे अनोखे तंत्रज्ञान

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget