(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP : राऊतांकडून नियुक्ती; गुजरांची स्थगिती, राष्ट्रवादीमधील कलह चव्हाट्यावर
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी बैठक बोलाविल्याने पक्षात सर्वच आलबेल नसल्याचे समोर आले आहे. केलेल्या नियुक्त्या कायम राहणार असल्याचेही बैठक घेऊन जाहीर केले.
नागपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन जिल्हाप्रमुखांच्या निवडीनंतर जिल्ह्यात पक्ष विभागला गेल्याचे चित्र आहे. नवे जिल्हाध्यक्ष राजू राऊत यांनी विचारात न घेता नियुक्त्या केल्याने जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी त्या रद्द केल्या. गुजर यांनी केलेल्या नियुक्त्या कायम राहणार असल्याचे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात बैठक घेऊन जाहीर केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी नुकतीच बैठक बोलाविल्याने पक्षात सर्वच आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत बदल केला. हिंगणा, उमरेड व काटोल विधानसभा क्षेत्रासाठी रमेश बंग यांचे निकटवर्ती राजू राऊत यांची नियुक्ती केली. तथापि, त्यांच्या नियुक्तीच्यावेळी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांना विचारात घेऊन कार्य करावे असे सांगण्यात आले. कार्यध्यक्षपदावरून बढती झालेल्या राऊत यांनी हिंगणा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे व उमरेड विधानसभा अध्यक्ष विलास झोडापे यांच्या नियुक्ती रद्द केली. त्यांच्या जागी नवीन पदाधिकारी नियुक्त केले. मात्र नियुक्ती करताना जिल्हाध्यक्ष गुजर यांनी विश्वासात घेतले नाही. यामुळे दोन्ही नियुक्त्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे बाबा गुजर यांनी बैठकीतून जाहीर केले. जिल्ह्यात पक्षात नियुक्ती करताना अधिकारांचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याचा आवाहन उपस्थित प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
Nagpur : आज हिवरी रे-आऊट येथे 'महागाईची दही हंडी', विजेता गोविंदा पथकाला 2 लाख 22 हजार 222 रुपयांचे पुरस्कार
बैठकीतून शक्तिप्रदर्शन
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर शिवराज बाबा गुजर यांनी कार्यकर्त्यांना एकसंध बाधून नवी कार्यकारिणी गठीत केली. निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करताना अधिकाधिक जागा मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नरत होते. मात्र, नव्या घडामोडीत त्यांच्यावर रामटेक, कामठी व सावनेर या विधानसभांचा कार्यभार गुजर यांच्यावर सोपवून राऊत यांची उर्वरित तीन विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्ती केली. राऊतांना मिळालेल्या तिन्ही विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीची फळी बळकट आहे. दुसरीकडे गुजर यांच्या वाट्याला आलेल्या तीन विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी केवळ नावापुरतीच आहे. तथापि, गुजर यांच्या पाठिशी कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याचे दाखविण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयातच बैठक घेऊन शक्तिप्रदर्शन केले. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे, प्रदेश महासचिव अविनाश गोतमारे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष जानबा मस्के, जि.प. सदस्य उज्जवला बोढारे, सतीश शिंदे, प्रदेश सचिव राजा आखरे, पूर्व विदर्भ सेवादल अध्यक्ष योगेश धनुस्कर, युवक अध्यक्ष आशिष पुंड, विद्यार्थी अध्य्ष आकाश गजबे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे, कामगार सेलचे अध्यक्ष सुधाकर तांबोळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.