एक्स्प्लोर

तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानेच मुलाचा मृत्यू, वृद्ध बापाचा नागपूर पोलीसांवर आरोप

वारंवार तक्रार करुनही दुर्लक्ष केल्यानेच तरुण मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप एका वृद्ध बापाने नागपूर पोलीसांवर केला आहे.

नागपूर : नागपूर शहरातील पोलीसांचा असंवेदनशीलपणा एका घटनेतून समोर आलाय. माझा तरुण मुलगा बेपत्ता असून तो अखेरचा काही कुख्यात गुन्हेगारांसोबत दिसला होता. ते त्याला बळजबरीने घेऊन गेलंय, असं वारंवार सांगणाऱ्या वृद्ध बापाची दखल नागपूर पोलिसांनी घेतलीच नाही. अखेरीस 67 दिवसानंतर त्या तरुण मुलाचा मृतदेहच वृद्ध वडिलांच्या नशिबी आला. पोलीसांच्या निष्क्रियता आणि निर्लज्जपणाचा कळस गाठणाऱ्या या नागपूरच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसलाय. भागवत ठाकरे (वय 60)27 नोव्हेंबर 2019 ला त्यांचा 25 वर्षांचा मुलगा मोनेश मित्रांना भेटून येतो असे सांगून गेला तर घरी परतलाच नाही. त्याच रात्री उशिरा त्याचा मोबाईलही बंद झाला. कोणीही वडील करेल तसेच प्रयत्न भागवत ठाकरे यांनी ही केले. पोलिसांकडे रीतसर तक्रार ही दिली. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारींकडे लक्षच दिलं नाही. तुझा मुलगा पळून गेला असेल. कुठे फिरायला गेला असेल अशी उत्तर देऊन पोलीसांनी वृद्ध भागवत ठाकरे यांना गप्प केलं. आता घटनेच्या 67 दिवसानंतर मोनेशचा मृतदेहाचे काही अवशेष नागपूरच्या जामठा परिसरात एका नाल्यात सापडले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 नोव्हेंबरला मोनेश पारडी परिसरातल्या काजल बारमध्ये आपल्या मित्रांसह बसलेला असताना कुख्यात गुन्हेगार अक्षय येवले त्याचे सहकारी निलेश आग्रे आणि अमोल हिरापूरे हे तिथे आले. काही वेळांनी तिघांनी मोनेशला सोबत नेले. तिघांनी मोनेशची त्याच रात्री परिसरातील शाळेच्या मागे एका झुडुपामध्ये धारधार शस्त्रांनी हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह तिथेच जाळून टाकला. दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे अवशेष अनेक किलोमीटर अंतरावरील जामठा परिसरात एका नाल्यात फेकून दिले. नागपूर हत्याकांडाचा 35 दिवसांनी उलगडा; पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम चित्रपटातून प्रेरणा तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानेच मुलाचा मृत्यू -  मोनेश बेपत्ता झाल्यापासून त्याचे वडील भागवत ठाकरे अनेक वेळेला पोलिस ठाण्यात गेले, वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी मुलाच्या शोधासाठी आर्जव केले. मात्र, पोलिसांनी प्रत्येकवेळी त्यांच्या आर्जवांकडे दुर्लक्ष केलं. ज्या कुख्यात अक्षय येवले वर माझ्या मुलाच्या बेपत्ता होण्याबद्दल माझी शंका आहे. तो अक्षय मला धमकावतोय, जीवे मारण्याची धमकी देतोय. भागवत ठाकरे यांच्या अशा तक्रारीकडेही पोलीसांनी लक्ष घातलं नाही. गेल्या 67 दिवसात पोलिसांनी भागवत ठाकरे यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले असते. तर कदाचित त्यांचा तरुण मुलगा आज जिवंत राहिला असता. आता पोलीसांनी मोनेशच्या हत्या प्रकरणात कुख्यात गुंड अक्षय येवलेसह त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. तर इतर काही आरोपी फरार आहे. मात्र, ठाकरे कुटुंबाचे जे नुकसान झालेले आहे, ते कधीच न भरून निघणारे आहे. Nagpur Metro | नागपूर मेट्रोकडून नवी जाहिरात प्रकाशित, पालकमंत्री, गृहमंत्र्यांच्या फोटोंचा समावेश | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
Girish Vyas: भाजपच्या बांधणीसाठी आम्ही आमची तरुणाई घालवली, घरावर तुळशीपत्र ठेवलं अन् आता..; गिरीश व्यास संतापले, पक्षाचा कार्यप्रणालीवरून जाहीर नाराजी, सर्व पदांचा राजीनामा!
भाजपच्या बांधणीसाठी आम्ही आमची तरुणाई घालवली, घरावर तुळशीपत्र ठेवलं अन् आता..; गिरीश व्यास संतापले, पक्षाचा कार्यप्रणालीवरून जाहीर नाराजी, सर्व पदांचा राजीनामा!
Maharashtra Drought: राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय
राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Embed widget