एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar: 'धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?', 'त्या' वक्तव्यावरुन विजय वडेट्टीवारांचा यू-टर्न, आता म्हणतात...

Vijay Wadettiwar On Pahalgam Attack : विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावरती टीक झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण दिलं आहे.

नागपूर: जम्मू काश्मीरमधील 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यंटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती हल्ल्यातील पीडितांनी दिली होती. त्यावरून एकीकडे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच दुसरीकडे या मुद्यावरून राजकारणाला देखील तोंड फुटलं. याचदरम्यान, राज्यातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्याच्या या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 'धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?' असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यानंतर वडेट्टीवार यांच्यावरती टीका झाल्यानंतर यावरती स्पष्टीकरण दिलं आहे. 

स्पष्टीकरण देताना काय म्हणालेत वडेट्टीवार?

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरती सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी टीका केल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आले आहे. मागचं पुढचं दाखवण्यात आलं नाही. अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर काहीतरी वेगळं वातावरण देशात निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक मीडिया जाणून बुजून करत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे जी राहुलजी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलेली आहे. ती आमच्या पक्षाची आहे. मी काल बोलताना असे बोलललो होतो, पहिल्यांदा असं होत आहे की, अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला. तेवढेच दाखवलं गेलं. त्यापुढे बोललो माझी सगळ्या चॅनलला विनंती आहे की पूर्ण दाखवा यावेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानने पाठवले, असंही पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

देशाला अस्थिर करण्यासाठी, देशातील दोन सामुदायांना आपापसात लढवण्यासाठी आणि देशाचं नुकसान करण्यासाठी पाकिस्तानने हे कृत्य केलं आहे. भारत देशाला अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शक्तींवर कारवाई करणाऱ्या केंद्र सरकारसोबत काँग्रेस उभी असेल असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. धर्म विचारून मारलं गेलं. हा देश कमजोर करायचा प्रयत्न केला गेला. एकात्मतेला, सार्वभौमत्वला, अखंडतेला खिंडार पाडायचं होतं म्हणून त्यांनी असं केलं, अतिरेक्याला कोणता धर्म नसतो. हे मी बोललो होतो. त्याच्या मागे पाकिस्तानचा जो उद्देश होता तो भारताला कमजोर करण्याचा होता. हा हल्ला भारतावरचा होता, म्हणून शिकवून पाठवलं. 26 वर्षानंतर पर्यटकांवर हल्ला होता. हे लपवण्याकरता माझं भाषण तोडून मोडून दाखवण्यात आलं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

मी माफी मागतोय. मीडियाला माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा.अर्धवट दाखवू नका. सरकारचं अपयश लपवण्यासाठी काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये, माझी भूमिका स्पष्ट होती. अतिरेकी पहिल्यांदा धर्म विचारत आहे. अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला शिकवून पाठवलं गेलं. देशातील दोन धर्मांमध्ये भांडण लावण्याचे काम करण्याचा आणि देश कमजोर करण्याचं काम पाकिस्तानचं होतं, असं माझं मत आहे, असंही पुढे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? मारणाऱ्याच्या कानात जाऊन तू हिंदू आहेस की मुस्लिम असं विचारण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? या प्रकरणात वेगवेगळे लोक वेगवेगळे दावे करत आहेत. काही जण असं घडल्याचं सांगत आहेत. तर काही जण असं घडलं नसल्याचं सांगत आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले होते. 

पहलगाममध्ये जे काही घडलं आहे, त्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे. तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, तुमची गुप्तचर यंत्रणा काय काम करत होती. 200 किलोमीटर आत येऊन दहशतवाद्यांनी लोकांना कसं काय मारलं? याबाबत कुणी काही बोलत नाही आहे. या सर्व गोष्टी ठरवून केल्या जात आहेत. सरळ सरळ दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करा, अशाप्रकारच्या बाता मारून मुद्द्याला भरकटवणं चुकीचं आहे, कुठलाही धर्म नसतो, दहशतवाद्यांनी देशावर हल्ला केला आहे. त्यामुळे त्यांना पकडून कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण देशभरात हीच भावना आहे. मात्र लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget