Maha Metro Tender : सौंदर्यीकरण आर्थिक स्त्रोत निर्मितीची संकल्पना, महा मेट्रोतर्फे व्यावसायिक निविदा प्रकाशित
सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर पार्किंग, अनुषंगिक व्यावसायिक वापराचा विकास आणि संचालन. यासह महा मेट्रोने अनेक व्यवासायिक निविदा प्रसारित केल्या आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
नागपूर: नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत नॉन-फेयर रेव्हेन्यू बॉक्स या अनोख्या संकल्पनेच्या माध्यमाने महा मेट्रोने आर्थिक स्रोत मांडले आहेत. यात प्रामुख्याने ट्रेन रॅपिंग, स्टेशन सेमी-नेमिंग, स्टेशनवर व्यावसायिक कामांकरिता जागा उपलब्ध करून देणे, मेट्रो परिसरात असलेल्या स्क्रीनवर जाहिरात देणे अश्या अनेक माध्यमाने महा मेट्रो महसूल मिळवीत आहे. या विविध योजनांना व्यापारी वर्गाने अनुकूल प्रतीसाद दिला आहे. याच शृंखलेत आता महा मेट्रोने मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारच्या निविदा प्रसारित केल्या असून ज्यामध्ये जास्तीत जास्ती नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महा मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे:
दुभाजकांचे सौंदर्यीकरण अन् जाहीरातही
मेडियन मिडीयन मेंटेनंस निविदा (रस्ते दुभाजक देखभाल संबंधी निविदा) ज्यामध्ये महा मेट्रोच्या रिच-१ (सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन) आणि रिच-३ (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) दरम्यान असलेल्या मिडीयन (दुभाजक) च्या रखरखाव व जाहिरात संबंधी हि निविदा असून या करता जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था या प्रक्रियेत निविदा भरून सहभागी होऊ शकतात.
Bhavna Gawali : आम्हाला गद्दार म्हटलं जातं, पण शिवसेना आमच्या बापानं उभी केली; भावना गवळींचा उद्धव ठाकरेंना टोला
पार्किंग जागेवर पीपीपी मॉडेल
5 वर्षाच्या कालावधीकरिता नागपूर मेट्रो रेल प्रकल्पातील ऑरेंज लाईन (लाईन-1) आणि ऍक्वा लाईन(लाईन-2) येथील निवडक मेट्रो स्थानकांच्या आत मेट्रोच्या माहिती प्रणाली टीव्ही स्क्रीन वर जाहिरात अधिकारांचा परवाना. प्रजापती नगर मेट्रो स्टेशन, नागपूर जवळील जागेवर सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर पार्किंग आणि अनुषंगिक व्यावसायिक वापराचा विकास आणि संचालन कार्य. या व्यतिरिक्त महा मेट्रोने अनेक व्यवासायिक निविदा प्रसारित केल्या असून त्याचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहन महा मेट्रोच्या वतीने करण्यात येत आहे.
NMC Elections : नागपुरात माजी नगरसेवक, अधिकारी संभ्रमातः सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर इच्छुकांमध्ये उत्सुकता
दुचाकी वाहनाकरीता नवीन मालिका सुरु
नागपूर : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (पूर्व) येथे दुचाकी वाहनाचा MH49-BV ही नोंदणी क्रमाकांची मालिका संपत असल्याने नवीन दुचाकी वाहनांकरीता MH49-BX अशी नवीन मालिका 25 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येत आहे. नागरिकांना वाहनाकरीता पसंतीचा क्रमांक घ्यावयाचा असल्यास वा आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज पत्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीचा नोंदणी क्रमांकासाठीच्या उप प्रादेशिक परिवहन अधीकारी, नागपूर (पूर्व) यांचे नावे काढलेल्या फीच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासहीत कार्यालयात स्वत: (नविन वाहन नोंदणी विभाग) येथे 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.30 या कालावधीत सादर करावेत. (दुपारी 2.30 नंतर तसेच दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमाने अर्ज स्वीकारले जाणार नाही), असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (पूर्व) यांनी केले आहे.