एक्स्प्लोर

Indian Science Congress : आज बाल विज्ञान काँग्रेस; अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर परिसंवाद

विज्ञान प्रदर्शनीमध्ये A ते F असे 6 हॅाल आहेत. आयआयटी मद्रास,  इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी, सेंट्रल ग्राऊंड वॅाटर बोर्ड, कौन्सिल आफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च आदी स्टॅाल असणार आहेत.

Indian Science Congress News Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरु असलेल्या 108 व्या राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस आज, बुधवारी (4 जानेवारी) 'बाल विज्ञान काँग्रेसचे' उद्घाटन, परिसंवाद, प्रदर्शन असे विविध कार्यक्रम असणार आहेत. विद्यापीठाच्या मुख्य कार्यक्रमस्थळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन झालं. यानंतर सकाळी 11 वाजता गडकरी यांच्या हस्ते येथील ए. पी. जे. अब्दुल कलाम दालनात 'बाल विज्ञान काँग्रेस' प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.

शहीद बिरसा मुंडा दालनात सकाळी 11 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. ए.के. डोरले सभागृहात सकाळी 9 वाजता 'पुरुष प्रजनन' विषयावर परिसंवाद होणार आहे. तर डॉ रामानुजन सभागृहात सकाळी 10 वाजता कोविडचे दीर्घकालीन परिणाम विषयावर परिसंवाद होईल. डॉ. ए. के. डोरले सभागृहात सकाळी 12 वाजता 'अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान' विषयावर परिसंवाद होणार आहे.

नोंदणी न करताही विज्ञान प्रदर्शनीला भेट

नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील प्रवेशद्वारावरुन प्रवेश केल्यावर सरळ गेल्यास उजव्या बाजूला नोंदणी करण्याचे मोठे डोम आहे. या ठिकाणी आपली नोंदणी करता येते. नोंदणी न करता देखील या ठिकाणी असणा-या विज्ञान प्रदर्शनीला भेट देता येते. या विज्ञान प्रदर्शनीत एकूण ए ते एफ असे सहा हॅाल असणार आहेत. हॅाल ए मध्ये आयआयटी मद्रास, इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, कौन्सिल आफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च आदी स्टॅाल असणार आहेत. यासोबतच नागपुरातील अनेक महाविद्यालये आणि शासकीय संस्थांचे स्टॅाल या हॅालमध्ये असणार आहेत. 

'हॉल बी'मध्ये... 

हॅाल बी मध्ये केंद्र शासनाच्या विविध संस्थांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. यात झुलॅाजिकल सर्वे ऑफ इंडिया, रजिस्टार जनरल आफ इंडिया, व्हीएनआयटी, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, इंडियन इन्स्टिट्यूड आफ ॲस्ट्रोफिजिक्स, इंडियन कौन्सिल फार मेडिकल रिसर्च आदी संस्थांचा समावेश असेल.

हॉल C,D आणि E मध्ये...

हॅाल सी, डी आणि ई हॅालमध्ये देखील विज्ञान विषयावर आधारित शासकीय तसेच खाजगी संस्थांचे स्टॅाल असणार आहेत. अत्यंत माहितीपूर्ण व आकर्षक असा हॉल हा डीआरडीओ या संरक्षण संस्थेचा असणार आहे. यात डीआरडीओच्या छत्राखाली येणा-या विविध निर्मिती संस्थांचे स्टॅाल असणार आहेत. अत्यंत वैविध्यपूर्ण असणाऱ्या या हॅालमध्ये डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी, सॉलिड स्टेट फिजिक्स लेबॅारेटरी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, अशा अनेक माहिती नसलेल्या संस्थांची माहिती देण्यात येणार असणार आहे.

'विज्ञान ज्योत'... 

स्टॅालच्या बाहेर ऑलिम्पिकच्या धर्तीवर विज्ञानविषयक ज्योत तेवत असणार आहेत. त्याबाजुला स्पेस ऑन व्हिल्स ही गाडी असणार आहे. यात इस्रोची माहिती  देण्यात येणार आहे. खऱ्या अर्थाने विविधांगी विज्ञान विषयक विविध संस्था, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे हे विज्ञान प्रदर्शन असणार आहे. यासोबतच विविध प्लेनरी सत्रांचे आयोजन करण्यात आले आहेत. या विज्ञानविषयक चर्चा करण्यात येणार आहे.

ही बातमी देखील वाचा...

इस्त्रोची माहिती देणारी गाडी 'स्पेस ऑन व्हिल्स' ; इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
Uddhav Thackeray Nagpur :आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Vishwas Nangre Patil: आता गुन्हेगारांची खैर नाही, नागपूरमध्ये पोलिसांना 'सर्व्हिस गन' बाळगणे बंधनकारक; विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय
आता गुन्हेगारांची खैर नाही, नागपूरमध्ये पोलिसांना 'सर्व्हिस गन' बाळगणे बंधनकारक; विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget