एक्स्प्लोर

मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ; वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी, कागदही भिरकावले

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या समस्यांवर बोलण्याची गरज असताना सरकार कशी पाडली आणि आपण मुख्यमंत्री कसे बनलो हे सांगतात, अशी टीकाही यावेळी आंदोलकांनी केली.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : वर्धा (wardha) येथे आजपासून सुरु झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत असतांनाच विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. यावेळी महिलाही आक्रमक दिसून आल्या. 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री भाषण देत होते. दरम्यान प्रेक्षकांमधून अचानक महिला आणि पुरुषांनी वेगळा विदर्भ झालाच पाहीजे, शेतकरी आत्महत्या थांबल्याच पाहीजे, बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्या करत आहेत. त्या तरुणांच्या आत्महत्या थांबल्याच पाहीजे अशा घोषणा देणे सुरु केले.

यावेळी उपस्थित पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटलं की, राज्याचे मुख्यमंत्री फक्त फित कापण्यात व्यस्त आहेत. तसेच सरकार स्थापन करुन खूप मोठी कामगिरी केल्याचे दाखवत आहेत. मात्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही. मुख्यमंत्री भाषण सुरु असताना विदर्भवाद्यांनी कागदं देखील भिरकावली. यावेळी विदर्भातील शेतकरी आत्महत्याकडे देखील लक्ष वेधले गेले. यावेळी झालेल्या गोंधळात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

शिंदेसाहेब या मुद्द्यांवरही बोला: आंदोलकांचा आक्रोश

विदर्भातही शेतकरी आत्महत्या करत आहे. दुसरीकडे वेगळा विदर्भ राज्य करुन विदर्भातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा. देशासह राज्यात वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुणाई नैराश्यात जात आहे. त्या नैराश्यातून तरुण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी या विषयांवर बोलण्याची गरज असताना सरकार कसं पाडलं आणि आपण मुख्यमंत्री कसे बनलो हे सांगतात, अशी टीकाही यावेळी आंदोलकांनी केली.

वर्ध्यामध्ये (Wardha) आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Marathi Sahitya Sammelan) आज पहिलाच दिवस आहे. मात्र, हा पहिलाच दिवस विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळं चर्चेत आला आहे. मराठी साहित्य संमेलनात तिसऱ्यांदा हा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आणि या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर त्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळं सभामंडपात मोठा गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, यावेळी विदर्भवादी महिलांही आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या.

ही बातमी देखील वाचा...

Cyber Attack : सैन्यासाठी स्फोटक बनवणाऱ्या नागपुरातील सोलर समूहाला खंडणीसाठी ई-मेल; 'डार्क वेब'वर डेटा विक्रीसाठी उपलब्ध? युद्धपातळीवर तपास सुरु

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget