एक्स्प्लोर

नागपूरवर क्राइम कॅपिटलचं लेबल कायम, सहा दिवसात सहा मर्डर

नागपूर जिल्ह्यात हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. नवीन वर्षात अवघ्या सहा दिवसात नागपूर जिल्ह्यात हत्येच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यामुळे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या होमटाऊन मध्येच गुन्हेगारांनी अक्षरश हैदोस मांडल्याचे चित्र आहे.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं होमटाऊन असलेल्या नागपूरवर क्राइम कॅपिटलचं लेबल कायम असल्याचं दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. नवीन वर्षात अवघ्या सहा दिवसात नागपूर जिल्ह्यात हत्येच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यामुळे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या होमटाऊन मध्येच गुन्हेगारांनी अक्षरश हैदोस मांडल्याचे चित्र आहे. आज सकाळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत काचूरवाही या ठिकाणी 54 वर्षीय अशोक वाडीभस्मे यांची हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात पुरून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अशोक वाडिभस्मे हे नागपूर जिल्ह्यातील काचूरवाही येथे पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत होते. पाच जानेवारीपासून ते बेपत्ता होते. सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रारही दिली होती. आज सकाळी काचूरवाही येथील त्यांच्याच मालकीच्या शेतात अशोक वाडीभस्मे यांचे मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी अशोक वाडीभस्मे यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवत आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले असून तपास केला जात आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात एकानंतर एक हत्येच्या सहा घटना घडल्या आहेत. यातील काही घटना तर गुन्हेगारांमधील संघर्षातून घडल्या आहेत. हेही वाचा- नागपुरात स्वयंघोषित 'डॉन'ला पोलिसांनी धडा शिकवला, रस्त्याने 'वरात' काढली नागपुर जिल्ह्यात सहा दिवसात सहा हत्या 4 जानेवारी : नागपूर शहरातील अजनी परिसरात महेश पोरंडवार यांची डोक्यावर हातोडीने वार करून हत्या. हत्येच्या आरोपाखाली पत्नीला अटक 6 जानेवारी : कन्हान गावात स्थानिक शिवसेना नेत्याच्या नातेवाईकाची गौरव बारमध्ये हत्या. गुन्हेगारी वृत्तीच्या तीन आरोपींनी संजू खडसेला चाकूने भोसकून मारले 7 जानेवारी : नागपूर शहरातील कांजी हाऊस चौकात समीर शेख उर्फ बाबू या गुन्हेगाराची आर के सावजी या हॉटेलमध्ये सर्वांसमोर हत्या. परिसरातील गुन्हेगारांच्या दुसऱ्या टोळीने पाठलाग करुन आणि घेरून हत्या केली 7 जानेवारी : नागपूर शहरातील वाठोडा परिसरात गंगा सेलिब्रेशन हॉल समोर अनोळखी मजुराची काही स्थानिक गुन्हेगारांनी दगडाने ठेचून हत्या केली. 7 जानेवारी : नरखेड गावात विनोद नारनवरे यांना सिमेंट रस्त्यावर डोके आपटून आपटून जखमी केले गेले, नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. 9 जानेवारी : काचूरवाही गावात शेतामध्ये अशोक वाडीभस्मे यांचे मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळले. संबंधित बातम्या  नागपुरात 'रॅश ड्रायविंग' करणाऱ्या गुंडाची नागरिकांनी मिळून केली हत्या  नागपुरात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, मित्रांकडूनच तरुणीवर सामुहिक बलात्कार  मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात 48 तासात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह  नागपुरात भर वस्तीत पाठलाग करुन महिला वकिलाची हत्या नागपुरातील बहुचर्चित भुपेंद्रसिंग हत्याकांडाचा पर्दाफाश, चार कुख्यात गुन्हेगारांना अटक  नागपुरात 'रॅश ड्रायविंग' करणाऱ्या गुंडाची नागरिकांनी मिळून केली हत्या  Nagpur Crime I नागपुरात कारचा हॉर्न वाजवला म्हणून एकाची हत्या

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Horoscope Today 23 July 2026: आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget