एक्स्प्लोर

भंडाऱ्यात तब्बल 20 किलोंचे जिवंत दुर्मिळ खवले मांजर जप्त; तस्करीसंदर्भात माहिती असल्यास 'या' टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार

Forest News : वन्य प्राण्यांची शिकार, तस्करी किंवा विक्री या संदर्भात काही माहिती असल्यास नागरिकांनी वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर कळवावे, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Indian Pangolin Rescued in Bhandara :  वनविभागाच्या पथकाद्वारे दुर्मिळ खवले मांजराची विक्री करणाऱ्यांवर सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 19.915 किलोंचे खवले मांजर जप्त करुन दोघांना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार खवले मांजर अनुसूची 1 मधील अत्यंत दुर्मिळ आहे, हे विशेष. अलिकडे जंगलात जंगली प्राण्यांच्या शिकार करुन विक्रीच्या घटना वाढल्या असून यावर नियंत्रणासाठी वन विभागानेही कंबर कसली आहे. यासोबतच वन विभागानेही तस्कर आणि शिकाऱ्यांवर वॉच ठेवणे सुरु केले आहे. या अंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भंडारा (Bhandara News) व नागपूर (Nagpur news) वनविभागाच्या (Forest Department) संयुक्त पथकाने खवले मांजर (Indian Pangolin) या वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे अनुसूची 1 मधील अत्यंत दुर्मिळ खवले मांजर जप्त केले आहे.

वनविभागानं अशी केली कारवाई

माहिती मिळाल्यानंतर पथकाने बनावट ग्राहकाद्वारे आरोपींसोबत संपर्क साधला. तसेच ठरलेल्या वेळेनुसार सौदा ठरला आणि आरोपी येताच पथकाने  रामेश्वर माणिक मेश्राम (रा. तिड्डी पो. मानेगांव ता. जि. भंडारा, वय - 32 वर्ष) व सचिन श्रावण उके (रा. खमारी (भोसा) पो. नेरी ता मोहाडी जि. भंडारा वय-29 वर्ष), या दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून 19.915 कि.ग्रॅ. वजनाचे जिंवत नर खवले मांजर (Indian Pangolin) जप्त करण्यात आले. 

माहिती असल्यास येथे करा संपर्क

वन्य प्राण्यांची शिकार, तस्करी किंवा विक्री या संदर्भात काही माहिती असल्यास नागरिकांनी वनविभागाच्या टोल फ्री क्र.1926 वर कळवावे अथवा जवळच्या वनविभागाच्या कार्यालयात माहिती द्यावी असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

आरोपींची कसून चौकशी सुरु असून आणखी काही तस्कर हातात लागू शकतात असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.  ही कारवाई नागपूर वनविभागाचे प्रितमसिंह कोडापे, विभागीय वनाधिकारी ( दक्षता) यांच्या नेतृत्वात प्रमोद वाडे ,वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा आय एम सय्यद आदींनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रंगनाथ नाईकवडे, मुख्य वनसंरक्षक नागपूर, राहुल गवई उपवनसंरक्षक, विवेक राजूरकर वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा व संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या भंडारा येथील पथकाद्वारे करण्यात येत आहे.

ही बातमी देखील वाचा...

Pachmarhi : पचमढी यात्रेसाठी नागपूरहून विशेष बसफेऱ्या ; दुपारपासून दर अर्ध्या तासाने सुटणार बसेस, असे करा बुकिंग...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Embed widget