(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : महावितरणच्या महिला तंत्रज्ञाचे डोके भिंतीवर आपटले; आरोपी न्यायालयीन कोठडीत
वारंवार विचारणा करूनही ग्राहकाने पावती दाखविली नाही. त्याचवेळी घरातील निलेश लहुजी किरणापुरे याने दीपाली खोब्रागडे यांच्यासोबत वाद घातला. शिवीगाळ करीत धक्काबुक्कीही केली.
नागपूरः वीजबिलाची थकबाकी वसुली (Electricity bill arrears) करणाऱ्या महावितरणच्या (MahaVitaran) कर्मचारी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर तिचे डोके पकडून भिंतीवर आपटण्यात आले. यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तुळशीबागेतील माळवी सुवर्णकार मंदिरजवळ ही घटना घडली. प्रारंभी पोलिसांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. पण, अधिकाऱ्यांकडून दबाव टाकताच कोतवाली (Kotwali Police Station) पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
हिंसक घटनांमध्ये वाढ
महाल विभागांतर्गत जुनी शुक्रवारी (Old Shukrawari) वितरण केंद्र येथे कार्यरत असणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ दीपाली खोब्रागडे या 16 सप्टेंबर रोजी वीजबिल थकबाकीच्या वसुलीसाठी गेल्या होत्या. तुळशीबाग रोडवरील माळवी सुवर्णकार मंदिराजवळ राहणारे शंकर बाळाजी किरणापुरे या ग्राहकाकडे जाऊन वीज बिलाची थकबाकीबाबत विचारणा केली. त्यांनी वीज बिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. ग्राहकाने आपण वीजबिल भरल्याचे सांगितले. खोब्रागडे यांनी ग्राहकाकडे वीजबिल भरल्याची पावतीची मागणी केली. वारंवार विचारणा करूनही ग्राहकाने पावती दाखविली नाही. त्याचवेळी घरातील निलेश लहुजी किरणापुरे याने दीपाली खोब्रागडे यांच्यासोबत वाद घातला. शिवीगाळ करीत धक्काबुक्कीही केली. त्यानंतरही दीपाली खोब्रागडे या वीज मीटरकडे जात असताना आरोपी निलेशने त्यांचे हात पकडून खाली ओढले व त्यांचे डोके जोरात भिंतीवर आपटले. त्यामुळे दीपाली खोब्रागडे यांच्या डोक्याला जबर मार लागला.
पाच दिवसांनंतर गुन्हा दाखल
ही घटना 16 सप्टेंबरला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर दीपाली खोब्रागडे कोतवाली (Kotwali PS) ठाण्यात पोहोचल्या. पोलिसांनी आरोपी निलेश किरणापुरेविरुद्ध अदखलपात्र (NC) गुन्ह्याची नोंद केली. याप्रकाराने वीजकर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा रोष उफाळून आला. त्यांनी वरिष्ठांकडे विचारणा करणे सुरू केले. त्यानंतर नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके व नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार (commissioner of police nagpur) यांची भेट घेतली. शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकरण गंभीर असून त्याची दखल घेण्याची विनंती केली. अमितेश कुमार यांनी त्यावर तातडीने कार्यवाही केली. त्यानंतर 21 सप्टेंबरला कोतवाली पोलिसांनी आरोपी निलेश लहुजी किरणापुरेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या