एक्स्प्लोर

Chandrapur Corruption : 50 लाखांची लाच, चार महिन्यानंतरही आरोपपत्र नाही; 'त्या' तीन अधिकाऱ्यांवर कोणाचा हात?

कंत्राटदाराला मृत व जलसंधारण विभागाकडून 1 कोटी 88 लाख 82 हजार रुपयांच्या बिलाच्या मंजुरीसाठी कमिशनच्या रुपाने तिन्ही अधिकाऱ्यांनी 81 लाख 2 हजार रुपयांची लाच मागितली होती.

नागपूरः एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)ने मे महिन्यात मृद व जलसंधारण विभागातील (Department of Soil and Water Conservation) तीन अधिकाऱ्यांना 50 लाख रुपयांची लाच स्विकारताना (accepting a bribe) पकडले होते. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र कारवाईनंतर चार महिने झाल्यानंतरही अद्यापही या प्रकरणात आरोपपत्र (charge sheet) दाखल झालेले नाही.

घटनाक्रम या प्रकारे...

चार मे रोजी एसीबीने (Anti Corruption Bureau) कविजीत पाटील (कार्यकारी अभियंता तथा प्रभारी अधीक्षक अभियंता मृद व जलसंधारण कार्यालय नागपूर), श्रावण शेंडे (उपविभागीय जलसंधारण अधिकारी, चंद्रपूर) आणि रोहित गौतम (विभागीय लेखा अधिकारी मृत व जलसंधारण कार्यालय चंद्रपूर) (Chandrapur) यांना रंगेहात अटक केली होती. 

बिले मंजूर करण्यासाठी लाच

एका कंत्राटदाराला मृत व जलसंधारण विभागाकडून 1 कोटी 88 लाख 82 हजार रुपयांचे बिल (Pending Bills) घ्यावयाचे होते. या बिलाला मंजुरी देण्यासाठी कमिशनच्या (Commission for approving bills) रुपाने तिन्ही अधिकाऱ्यांनी 81 लाख 2 हजार रुपयांची लाच मागितली होती. कंत्राटदाराने एसीबीचे अधीक्षक राकेल ओला (Rakesh Ola) यांची भेट घेऊन प्रकरण मांडले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांना 50 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातून निलंबित देखील करण्यात आले होते.

चार महिन्यानंतरही आरोपपत्र नाही

या प्रकरणात चार महिने होत आले असले तरी अद्यापही तीनही अधिकाऱ्यांविरोधात (Three Officers) आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. यावरून विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात एसीबी सोबत संपर्क साधला असता आरोपपत्राची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.  तीनही अधिकारी सरकारी विभागातील होते व आरोपपत्र दाखल करण्याअगोदर त्यांच्या संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सुरु असून त्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नोटांऐवजी लाचेच्या रकमेत रद्दी

अधिकाऱ्यांना लाच देण्याकरता कंत्राटदारासाठी 81 लाख 2 हजार रुपयांची व्यवस्था करणे कठीण होत होते. एसीबीने ब्रम्हपुरीत जाऊन 50 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या शेंडेला रंगेहात पकडण्याची योजना आखली. लाचेच्या रकमेची त्वरित व्यवस्था करणे शक्य नसल्यामुळे एसीबीने कंत्राटदाराला नोटांची बॅग दिली. त्यात 5 लाख रुपयांचे नोटांचे बंडल आणि 45 लाख रुपयांची रद्दी ठेवली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav Special Trains : विदर्भवासियांना थेट कोकण, गोव्यातील गणेशोत्सव बघण्याची संधी, स्पेशल ट्रेन 'फुल्ल'

Ramdaspeth Nagpur : पावसामुळे खचला ब्रिटिशकालीन पूल, मनपाकडे हस्तांतरीत केल्यावर देखभालीची दखलच नाही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget