एक्स्प्लोर

नागपुरात रेशन मालाचा काळाबाजार उघड, गरीबांचा घास हिरावणाऱ्या दुकानदाराविरोधात गुन्हा

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानीय गुन्हे शाखेने संबंधित दुकानावर छापा टाकला असता रेशन दुकानदाराने गरिबांच्या हक्काचे तब्ब्ल 4 हजार किलो तांदूळ दुसरीकडे साठवल्याचे उघड झाले आहे.

नागपूर : शासनाकडून आलेल्या स्वस्त धान्याचा काळाबाजार केला जात आहे. गरिबांना धान्य न देताच ते काळाबाजारीसाठी पाठवून शासनाची कशी दिशाभूल करणे सुरु आहे. असा एक दुर्दैवी प्रकार  नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा येथे स्वस्त धान्य दुकानात आलेला हजारो किलो धान्य गरीब कुटुंबाना न वाटताच त्याची रवानगी काळाबाजार करण्यासाठी इतरत्र केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानीय गुन्हे शाखेने संबंधित दुकानावर छापा टाकला असता रेशन दुकानदाराने गरिबांच्या हक्काचे तब्ब्ल 4 हजार किलो तांदूळ दुसरीकडे साठवल्याचे उघड झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे दुकानाचे रजिस्टर चेक केले असता हे सर्व धान्य गरीब ग्राहकांना वाटल्याचे दर्शवण्यात आले होते. मात्र कोणत्याही गरिबाला धान्य न वाटता ते परस्पर बाहेर विकण्यासाठी इतरत्र साठविल्यामुळे शासनाची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या तांदळाच्या सर्व 81 पोत्यांवर शासनाची सील लागलेले आहे. पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानदार दिलीप कळमकर विरोधात गुन्हा दाखल करत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना चौकशी सोपविली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नागपुरातील स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार सुरु असल्याचा आरोप आशिष जयस्वाल यांनी सुद्धा केला होता.
नागपुरात रेशन मालाचा काळाबाजार उघड, गरीबांचा घास हिरावणाऱ्या दुकानदाराविरोधात गुन्हा
सिल्लेवाडा येथे स्वस्त धान्य दुकानात आलेला हजारो किलो धान्य गरीब कुटुंबाना न वाटताच त्याची रवानगी काळाबाजार करण्यासाठी इतरत्र केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानीय गुन्हे शाखेने संबंधित दुकानावर छापा टाकत कारवाई केली. यावेळी रेशन दुकानदाराने गरिबांच्या हक्काचे तब्ब्ल 4 हजार किलो तांदूळ दुसरीकडे साठवल्याचे उघड झाले आहे. एकीकडे लॉकडाऊनमध्ये सरकार आणि प्रशासन गोरगरीब जनता उपाशी राहू नये यासाठी उपाययोजना करत आहे. मात्र अशा घटनांनी सरकारच्या या प्रयत्नांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायदा प्रारुप स्थगित, डिसेंबरमध्ये नवा कायदा आणणार, चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा
साडे पाच लाख हेक्टर जमिनींचा प्रश्न, देवस्थान इनाम जमीन कायदा प्रारुप स्थगित, चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा
CAMIT : पेट्रोल- डिझेल कॅन किंवा डबकीमध्ये दिल्यास पंपाचा परवाना रद्द होणार, सरकारच्या निर्णयाला कॅमीट संघटनेचा तीव्र विरोध, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
पेट्रोल- डिझेल कॅन किंवा डबकीमध्ये दिल्यास पंपाचा परवाना रद्द होणार, सरकारच्या निर्णयाला कॅमीट संघटनेचा तीव्र विरोध, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
Nagpur Crime News: मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले; पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही म्हणून विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, शेवटच्या चिट्ठीत म्हणाली....
मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले; पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही म्हणून विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, शेवटच्या चिट्ठीत म्हणाली....
Mohan Bhagwat : हिंदू समाज जागृत होत असून त्याचे चांगले परिणाम समोर येत आहेत; मोहन भागवतांचं वक्तव्य, नागपुरात संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग सोहळा
हिंदू समाज जागृत होत असून त्याचे चांगले परिणाम समोर येत आहेत; मोहन भागवतांचं वक्तव्य, नागपुरात संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग सोहळा

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
Embed widget