एक्स्प्लोर
निवडणूक काळात दारु बनवण्यासाठी मध्यप्रदेशातून आणलेला दोन टन गूळ जप्त
हातभट्टीवर दारु तयार करण्यासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आणलेला दोन टन गूळ उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

नागपूर : निवडणूक काळात मतदारांना प्रलोभने देण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारुचे वाटप केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने हातभट्टीवर बनवल्या जाणाऱ्या दारुचा समावेश असतो. हातभट्टीवर दारु तयार करण्यासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आणलेला दोन टन गूळ उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर मध्य प्रदेश सीमेवर उत्पादन शुल्क विभागाने 13 विशेष तपासणी पथके तैनात केली आहेत. नागपुरात हातभट्टीवर दारु तयार करण्यासाठी मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गूळ येत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार वाहन तपासणी करताना 2 टन गूळ जप्त करण्यात आला आहे.
सावनेरमधील सिरोंजी चेक पोस्टवर तैनात असलेल्या पथकाला एका वाहनात गूळ असल्याचे दिसून आले. वाहनातील आरोपींनी हा गूळ मध्य प्रदेशातून नागपूरच्या भिवसन खोरी येथे मद्य निर्मितीसाठी नेत असल्याचे सांगितले. चौकशीनंतर उत्पादन शुल्क विभागाने वाहन चालक व मालकाला ताब्यात घेतले आहे.
लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून 103 प्रकरणात 100 आरोपींवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. तर मोठी मद्याची दुकाने व कारखान्यांवर नजर ठेवण्यासाठी 100 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्हींचे थेट प्रक्षेपण उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पाहण्याची व्यवस्थादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
