एक्स्प्लोर
Advertisement
21 वर्षीय यूट्यूब स्टार दानिश झेहेनचा कार अपघातात मृत्यू
21 वर्षांचा दानिश यूट्यूब चॅनेलमुळे प्रसिद्धीस आला होता. लाईफस्टाईलवर आधारित त्याच्या चॅनेलला तीन लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स होते.
मुंबई : प्रसिद्ध यूट्यूबर आणि एमटीव्हीवरील 'एस ऑफ स्पेस' शोमधील स्पर्धक दानिश झेहेनचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नवी मुंबईत मित्राच्या लग्नावरुन परत येताना गुरुवारी सकाळी हा भीषण अपघात झाला.
अपघाताच्या काही काळ आधीच दानिशने कारमधून इन्स्टाग्राम स्टोरी केली होती. भरधाव वेगात असलेली दानिशची कार उलटून अपघात झाला. यामध्ये त्याच्या कारचा चक्काचूर झाला. हा घातपाताचा कट असल्याचा आरोप करत दानिशच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली आहे.
21 वर्षांचा दानिश यूट्यूब चॅनेलमुळे प्रसिद्धीस आला होता. लाईफस्टाईलवर आधारित त्याच्या चॅनेलला तीन लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स होते. याशिवाय तो एका फॅशन ब्लॉगमधून मेक अप टिप्सही देत असे. दानिशच्या हेअरस्टाईलचेही अनेक चाहते होते.
दानिशची लोकप्रियता पाहून एमटीव्हीने त्याला 'एस ऑफ स्पेस' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं. दानिश सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून इन्स्टाग्राम स्टोरी, टिकटॉक व्हिडिओ करण्यात तो आघाडीवर होता.
Last video of #DanishZehen RIP💔#AceOfSpace If possible toh plz avoide phone aur making video while driving 2 min ka fun is more important than life 🙌🙏💔 pic.twitter.com/1XySiOUqWF
— vg ki khoj main|| we support vikas (@Monika6600) December 20, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement