एक्स्प्लोर
Advertisement
एमआरआय मशिनने आत खेचलं, मुंबईतील रुग्णालयात तरुणाचा मृत्यू
हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीमुळे या युवकाने प्राण गमावल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : एमआरआय मशिनमध्ये खेचलं गेल्यामुळे मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीमुळे या युवकाने प्राण गमावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
राजेश मारू असं या 32 वर्षीय युवकाचं नाव असून तो आपल्या बहिणीच्या सासूला बघायला नायर हॉस्पिटलमध्ये गेला होता. पेशंटचा एमआरआय करण्यास सांगितला गेला. त्यामुळे राजेश पेशंट आणि मेहुण्यासोबत एमआरआय रुमकडे निघाले.
राजेश पुढे होता आणि राजेशच्या हातात ऑक्सिजन सिलेंडर होता. एमआरआय सेंटरमध्ये कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसते. 'मशिन अजून बंद आहे तुम्ही आत जाऊ शकता', असं वॉर्डबॉयने सांगितलं. पण जेव्हा राजेश आत गेला तेव्हा मशिन सुरू होत्या. मशिनने सिलेंडर सोबत राजेशलाही खेचून घेतलं. त्याला त्वरीत बाहेर काढण्यात आलं, मात्र उपचारा दरम्यान राजेशचा मृत्यू झाला.
दरम्यान, डॉक्टर आणि वॉर्ड बॉयसह 3 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. आमदार मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाच्या डीनच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं. तर मृत राजेश मारुच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने 5 लाखांची मदत दिली जाईल अशी माहिती आमदार लोढा यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement