एक्स्प्लोर
ठाणे-बोरिवली बसमध्ये युवकाचा 70 वर्षीय महिलेवर गोळीबार
ठाणे : ठाणे-बोरिवली बसमध्ये क्षुल्लक कारणावरुन 30 वर्षीय युवकाने वृद्धेच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात एक महिला जखमी झाली आहे.
सुमेध करंदीकर असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव असून तो दारुच्या नशेत असल्याची माहिती आहे. सुमेध हिंदुस्थान कामगार सेनेचा तालुकाप्रमुख असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. कासारवडवली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
ठाणे-बोरिवली बसमध्ये सुमेधचं 70 वर्षीय महिलेसोबत भांडण झालं. याच रागातून त्याने गावठी कट्ट्यानं महिलेवर गोळीबार केला. यामध्ये महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement