एक्स्प्लोर
मुंबईत छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला मारहाण, आरोपी अटकेत
मुंबईतल्या नेहरुनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीने छेडछाडीला विरोध केल्याने तिला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई : कुर्ल्यातील अल्पवयीन मुलीला मारहाण करुन बेशुद्ध करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. 17 ताऱखेला कुर्ल्यातील नेहरूनगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी इम्रान शेखवर किरकोळ गुन्हा दाखल करुन त्याची सुटका केली होती.
मात्र, या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर एबीपी माझानं पोलिसांच्या भूमिकेवरती थेट सवाल उपस्थित केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत इम्रान शेखला अटक केली. त्याच्याविरोधात पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल होणार असल्याचं समजतं आहे.
कुर्ल्यातील नेहरुनगरमध्ये 17 ऑक्टोबरला पीडित अल्पवयीन मुलगी ट्यूशनला जात होती. तेव्हा रस्त्यात काही टवाळखोर मुलांनी तिची छेडछाड काढायला सुरुवात केली. त्याला मुलीनं विरोध केला आणि ती घरी जाण्यास निघाली. यानंतर रिक्षातून एक मुलगा उतरला आणि त्यानं या मुलीला जोरदार मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे.
मारहाणीनंतर मुलीनं आणि तिच्या पालकांनी कुर्ल्यातील नेहरुनगर पोलीस स्टेशनकडे धाव घेऊन मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात तक्रार केली. मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी इम्रान शेखवर गुन्हा दाखल केला. मात्र, किरकोळ स्वरुपाचे गुन्हे नोंद केल्यानं, त्याची जामिनावर सुटका झाली.
दरम्यान, आता या प्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईचा अहवाल पोलीस आयुक्तांकडून मागवला असून, पोलिसांच्या कारवाईवर महिला आयोगाची बारकाईनं लक्ष असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement