Yakub Memon Grave Controversy Live Updates : याकूब मेमन कबर प्रकरणाची चौकशी DCP नीलोत्पल करणार
Yakub Memon Grave Controversy Live Updates :याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी माझानं काल दिली. यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे.लोकांमध्ये यासंदर्भात संताप आहे.

Background
Yakub Memon Grave Controversy Live Updates : याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी माझानं काल दिली. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या पोलिसांनी याकूबच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्स हटवल्या आहेत. 18 मार्च 2022 रोजी कबरीवर लाईट्स लावल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आलीय. शब ए बारातच्या दिवशी लाईट्स लावण्यात आल्याची माहिती आहे. या दिवशी लोक पूर्वजांच्या कबरीवर प्रार्थनेसाठी जातात. त्यावेळी कबरीवर लाईट्स लावण्यात आले अशी माहिती तपासात समोर आलीय. मुंबई बॉम्बस्फोटातला (Mumbai Bomb Blast) गुन्हेगार आणि कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Meman) कबरीचं सुशोभिकरण केल्याचा प्रकार एबीपी माझानं समोर आणल्यानंतर पोलीस आणि प्रशासन खडबडून जागं झालं आहे. याकुबच्या कबरीवरील एलईडी लाईट्स पोलिसांनी काढून टाकल्या आहेत.
मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि यंत्रणा खडबडून जागी झाली. माझाच्या बातमीची दखल घेत पोलिसांनी कबरीवर तातडीनं कारवाई केली. याकूब मेमनच्या कबरीवर लावण्यात आलेल्या एलईडी लाईट्स पोलिसांनी काढून टाकल्या आहेत. देशाचा दुश्मन असलेल्या याकूब मेमनच्या कबरीची सजावट केल्याची बातमी आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. माझाच्या बातमीनंतर पोलिसांनी तातडीनं दखल घेऊन दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये धाव घेतली आणि कबरीवरील एलईडी लाईट्स हटवली.
भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकमेकांवर आरोप
याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणावरून भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण झालं, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. तर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे की, सर्वात मोठी चूक भाजपची आहे. यूपीए सरकारच्या काळात दोन कुख्यात दहशतवाद्यांना फाशी देण्यात आली. एक अफजल गुरू आणि दुसरा कसाब. मात्र सरकारने दोघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले नाहीत. याचं कारण म्हणजे या लोकांच्या कबरी, ज्या ठिकाणी हे लोक दफन केले जातात, ती जागा कोणाला तरी रेलिंग पॉइंट बांधण्याची संधी देते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार झाले. इतके लोक का सामील झाले? भाजपने राजकीय फायद्यासाठी हे केले. याकुब मेमनच्या कबरीचा गौरव आज होत आहे. याला भाजप थेट जबाबदार आहे, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.
एबीपी माझानं समोर आणलं होतं वास्तव
एबीपी माझानं याकुब मेमनच्या कबरीला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याबाबतचं वृत्त पहिल्यांदा दाखवलं होतं. मेमनला फाशी दिल्यानंतर त्याच्या प्रेताचं दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं. त्या ठिकाणच्या ओठ्याला एकंदरीत संगमरवरी बसवण्यात आल्या आहेत. त्यावर एलईडी दिवे लावले होते. हे दिवे रात्रीच्या वेळी चालू असतात आणि मुख्यतः मेमनच्या कबरीवर प्रकाश टाकण्यासाठी लावण्यात आले होते. एका कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून या कबरीसाठी वीजपुरवठा केला जात होता. यावर आता प्रशासनानं अॅक्शन घेतली आहे. आता यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून याकूब मेमनच्या कबरीची पाहणी.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून याकूब मेमनच्या कबरीची पाहणी करण्यात आली आहे. याकूबच्या कबरीवर यापुढे कोणतंही काम होणार नाही, अशी माहिती यावेळी सोमय्या यांनी दिली आहे. परंतु, याकूब याचं कुटंबीय पूजा विधी करू शकतात.
याकूब मेमन कबर प्रकरणाची चौकशी DCP नीलोत्पल करणार
याकूब मेमन कबर प्रकरणाची चौकशी DCP नीलोत्पल करणार, एलटी मार्ग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक हे तपास अधिकारी असतील. पोलीस वक्फ बोर्ड, बीएमसी आणि धर्मादाय आयुक्तांकडून माहिती घेत आहेत























