एक्स्प्लोर

Yakub Memon : मुंबईत अतिरेक्याची कबर सजवली? याकुब मेमनच्या कबरीवर संगमरवरी फरशा अन् लायटिंग

Mumbai Bomb Blast : मुंबई बॉंबस्फोटातील आरोपी याकुब मेमनच्या कबरीला व्हीआयपी वागणूक देण्यात येत असून त्यावर संगमरवरी फरशा अन् लायटिंग करण्यात आली आहे. 

मुंबई : कबरीसाठी संगमरवरी दगडातलं बांधकाम, एलईडी लाईट्स अन् चोवीस तास पहारा. मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये एका कबरीला ही अशी व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आहे. पण ही कबर कोणत्या पीरबाबाची मजार नाही तर मुंबईतील सर्वात मोठा गुन्हेगार, दहशतवादी असलेल्या याकुब मेमनची (Yakub Memon) आहे. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी याकुब मेमनला जिथे दफन करण्यात आले आहे ती कबर जमीन त्याच्या कुटुंबाने खरेदी केली आहे का? मुस्लिम दफनभूमी ट्रस्टींनी विकली आहे का? असा सवाल विचारला जात आहे. 

याकुबची कबर सजवली 

याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याच्या प्रेताचं दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं. त्या ठिकाणच्या ओठ्याला एकंदरीत संगमरवरी बसवण्यात आल्या आहेत. त्यावर एलईडी दिवे लावले आहेत. हे दिवे रात्रीच्या वेळी चालू असतात आणि मुख्यतः मेमनच्या कबरीवर प्रकाश टाकण्यासाठी लावण्यात आले आहेत. एका कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून या कबरीसाठी वीजपुरवठा केला जातो. कबर जमीन विकली नाही तर फाशी झालेल्या दोषीच्या कबरला इतकी व्हीआयपी वागणूक का? असा सवाल विचारला जात आहे. 

जुलै 2015 मध्ये याकुबला फाशी झाली. त्यानंतर मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये त्याच्यावर अत्यंसस्कार झाले. तिथंच त्याची कबर उभारण्यात आली. पण आज ही कबर पाहिली तर ही कबर नाही तर जणू एक मजार झाल्याचं चित्र आहे.  

दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तान येथील विश्वस्तांचा दावा आहे की मुस्लिम दफनभूमी ही वक्फ बोर्डाच्या अख्यत्यारित येते आणि कोणतीही कबर विकली जाऊ शकत नाही. मृतदेहाचं विघटन होण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे प्रत्येक कबरीची जागा 18 महिन्यानंतरच खोदली जाते असा मुंबई महापालिकेचा जीआर सांगतोय.

त्यामुळे खालील प्रश्न समोर येतात, 

  • पाच वर्षांनंतरही याकुब मेमनची कबर का खोदली नाही?
  • मुस्लिम दफनभूमीतली जागा विश्वस्तांनी विकली आहे का? 
  • मेमन कुटुंबाने सात कबरींच्या ओट्याची जागा कायमची खरेदी केली आहे का? 
  • याकुबच्या कबरीची मजार करण्याचा प्रयत्न सुरु आहे का?
  • याकुबच्या कबरीचा ताबा मेनन कुटुंबियांकडे का आहे का?
  • फाशी झालेल्या याबूकच्या कबरीला व्हीआयपी वागणूक का?

मुंबईत 1993 साली साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात 257 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच प्रकरणात याकुबला अटक झाली. फाशी झालेला तो एकमेव आरोपी होता आणि त्याच्याच कबरीला आता असं सजवण्यात आलं आहे.

कबरीच्या सजावटीचं प्रकरणापेक्षा खरा ट्वीस्ट तर पुढे आहे, तो म्हणजे याकुबचा चुलत भाऊ मोहम्मद अब्दुल रौफ मेमन याने एलटी मार्ग पोलिसांकडे  2019 साली एक तक्रार केली आहे. याच तक्रारीत याकुब मेमनच्या कबरीची जागा कब्रस्तानच्या विश्वस्तांनी पाच लाख रुपयांला विकल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि गुन्ह्याची नोंद केली. 

दुसरीकडे याकुबच्या कुटुंबाला याकुबच्या कबरीच्या देखभालीच्या पावत्या मिळत होत्या. पण जर कबरच विकली गेली असेल तर पावत्या कुठून आल्या असा सवाल याकुबच्या भावाचा आहे. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा या पावत्या बनावट असल्याचं समोर आलं. तेव्हा कळलं की सात ओट्यापैकी चार ओटे अंजुम मर्चंट आणि फय्याज मर्चंट यांना विकले गेलेत. तसाप सुरु असल्यामुळे चारही कबरींच्या ओट्यांच्या ठिकाणी कुणालाही दफन करु नये असे आदेश पोलिसांनी दिलेत. 

याकूबची कबर मिळण्यासाठी कुटुंबियांनी विश्वस्तांना तीन लाख रुपये दिले. परंतु त्यांना पावती मिळाली नाही असाही आरोप कुटुंबियांनी केला आहे. 

खरंतर कब्रस्तानची जागा वक्फ बोर्डाची मालमत्ता असते. त्याच्या कायदानुसार कबरींची जागा विकली जावू शकत नाही. ती कुटुबियांना फक्त देखभालीसाठीची दिली जाते. मग प्रश्न असा आहे की याकुबच्या कबरीजवळ सात जणांची जागा कशी काय? इतकंच नाही तर त्या ओट्याला सजावट केली, त्यासाठी नक्की कुणाचे आशीर्वाद आहेत? याचा शोध घ्यायला हवा. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget