एक्स्प्लोर

वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?

कोर्टाच्या परवानगीशिवाय पोलिसांनी एका बंद खोलीत मिहीर शाहाला त्याच्या नातेवाईकांना भेटण्यास दिले.या सर्व प्रकारावरुन पोलीस मिहीरवर एवढं मेहरबान का? असा सवाल उपस्थित होतोय

मुंबई : वरळी अपघातातील (Worli Car Accident)  आरोपी मिहीर शाहाला (Mihir Shah)  पोलिसांकडून व्हीआयपी (VIP Treatment)  ट्रिटमेंट मिळत असल्याचं दिसून येतंय. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून आरोपी मिहीर शाहाला कोर्टात आणण्यासाठी खासगी कारचा वापर करण्यात आली.  कोर्ट ते जेल मिहीरची ने -आण करण्यासाठी  ब्लॅक फिल्म लावलेल्या कारचा वापर पोलिसांकडून करण्यात आला. तर  दुसरीकडे सुरक्षेचं कारण सांगणाऱ्या याच पोलिसांकडून मिहीर शाहाची कोर्टात नातेवाईकांसोबत भेट घडवून दिली. कोर्टाच्या परवानगीशिवाय पोलिसांनी एका बंद खोलीत मिहीर शाहाला त्याच्या नातेवाईकांना भेटण्यास दिले.या सर्व प्रकारावरुन पोलीस मिहीरवर एवढं मेहरबान का? असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान आजच्या सुनावणीदरम्यान मिहीर शाहाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी आरोपी मिहिर शाहाची पोलीस कोठडी संपली.  मिहीर शाहला आज न्यायालयात हजर केलं त्यानंतर    मिहीर शाहाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिहीरने पोलिसांना दिलेला कबुलीजबाब वाचून कोठडी सुनावण्यात आली आहे .  वरळी हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत 17  जणांचे जबाब नोंदवले.  यात 5 ते 6 प्रत्यक्षदर्शी अपघात पाहणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिहिरला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांकडून खाजगी कारचा वापर

आरोपी मिहिर शहाला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांकडून खाजगी कारचा वापर करण्यात आला आहे.  पोलिसांनी मिहिरला कोर्टात आणण्यासाठी एरटिगा कार  वापरली. काचेवर ब्लॅक फिल्म असलेली कार आरोपीला ने आण करण्यासाठी पोलिसांनी वापरली. खाजगी गाड्यांवर ब्लॅक फिल्मला बंदी आहे पण आरोपीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने ही कार वापरल्याचा दावा पोलिसांना केला आहे. पोलिसांनी मिहीरच्या केसमध्ये 100 (2) , 177 हे मोटर अधिनियम कायदा कलम वाढवलं. या कलमाचा अर्थ आरोपी वापरत असलेली बीएमडब्ल्यू कारला ब्लॅक फिल्म होती.अपघातातील गाडीचा इन्श्युरन्स आणि पियूसी देखील संपल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. 

आज शिवडी कोर्टात पोलिसांनी काय युक्तिवाद केला?

नंबर प्लेट अद्याप सापडली नाही. कोणत्या वाहनाने आरोपी फरार झाला होता तेही अद्याप समोर आलं नाही.दाढी आणि केस का कापले तेही अद्याप कळल नाही.आरोपीने लायसन्स आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांना दिलेली आहेत. घटनेनंतर आरोपी कसा फरार झाला ते अद्याप शोधायचे आहे. आम्हाला अजून काही दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज आहे.घटनेच्या वेळी आरोपीने घातलेले कपडे आम्हाला जप्त करायचे आहेत.आतापर्यंत 27 लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. बीअरच्या कॅन जप्त केलेल्या आहेत. जिथे मिहीरने केस कापले त्या सलूनच्या मालकाचा जबाब नोंदवला आहे.

मिहीरच्या वकिलांचा युक्तिवाद?

कारच्या मागच्या बाजूची नंबरप्लेट पोलिसांकडे आहे तर मग पुढची नंबरप्लेट घेऊन पोलीस अस काय वेगळं करणार आहेत. गाडीचा नंबर पोलिसांकडे आहे गाडी जप्त आहे. आरोपीच्या आईला आणि बहिणीला बोलावून समोरासमोर पोलिसांनी चौकशी केलेली आहे. न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. ड्रायव्हरला समोरासमोर बसवून चौकशी केलेली आहे. आता पोलीस कोठडीची गरज नाही.

Video : वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी मिहीर शाहाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हे ही वाचा :

Worli Hit And Run Case : चूक झाली, माझं करिअर उद्ध्वस्त, घटनेचा पश्चाताप होतोय; पोलिसांसमोर मिहीर शाहाची रडारड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
Mega Block :  मुंबईकरांसाठी मोठी बातमी,  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
Nepal Bus accident : वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांची घोषणा; पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांची घोषणा; पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray on BJP : भाजप विकृतीच्या बाजूने म्हणून... आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोलNepal Bus Accident : Jalgaon Family : नेपाळमध्ये झालेल्या अपघातात जळगावातील 25 जणांचा मृत्यूSpecial Report Banjara Samaj : बंजारा समाज विधानसभेत राबवणार 'जरांगे पॅटर्न' ABP MajhaYogesh Kadam on RPI : महायुती राहील की नाही याबाबत बोलणार नाही पण... शिवसेना RPI सोबत राहील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
Mega Block :  मुंबईकरांसाठी मोठी बातमी,  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
Nepal Bus accident : वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांची घोषणा; पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांची घोषणा; पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसाठी किती महिला पात्र? आत्तापर्यंत किती अर्ज प्राप्त? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसाठी किती महिला पात्र? आत्तापर्यंत किती अर्ज प्राप्त? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Helicopter crash : माणूसकी मदतीला धावली; हेलिकॉप्टर अपघाग्रस्तांसाठी हॉटेलमधील 'वेटर बनले देवदूत'
माणूसकी मदतीला धावली; हेलिकॉप्टर अपघाग्रस्तांसाठी हॉटेलमधील 'वेटर बनले देवदूत'
UPS Scheme: मोठी बातमी! मोदी सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; UPS पेन्शन योजनेस कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी! मोदी सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; UPS पेन्शन योजनेस कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर
मोठी बातमी : मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर
Embed widget