एक्स्प्लोर

Worli Accident : आरोपीने दारू ढोसलेल्या जुहूतील बारवर कारवाई सुरू, वरळी हिट अँड रन प्रकरणी एक्साईज विभाग अॅक्शन मोडमध्ये

Worli Hit And Run Accident : आरोपीने शनिवारी रात्री उशिरा जुहूतील वाईस ग्लोबल बारमध्ये दारू प्यायली आणि त्या नशेतच गाडी चालवून वरळीजवळ एका महिलेचा जीव घेतला.  

मुंबई: वरळी हिट अँड रन केसची (Worli Hit And Run Case) घटनेनंतर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Department) ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जुहू परिसरात वाईस ग्लोबल बारवर कारवाईला सुरुवात केली आहे. वाईस ग्लोबल तपास बारमधून आरोपी मिहीर शाह शनिवारी रात्री आपल्या मित्रांसोबत दारू पार्टी करून बाहेर निघाला होता. त्यानंतर आरोपीकडून वरळी परिसरात हिट अँड रान केसची घटना घडली आणि त्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. 

मुंबई पोलिसांसोबत आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला देखील वेग आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन टीम बारमध्ये सध्या माहिती घेऊन कारवाई करत आहे. बारमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमाचं पालन केलं जात होतं का आणि हा बार रात्री उशिरापर्यंत चालू होता का या संदर्भात देखील माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे.

अपघात कसा झाला? 

मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं कावेरी आणि प्रदीप नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली.

धडक दिल्यानंतरही चारचाकी गाडीच्या चालकाने गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कावेरी नाकवा यांना फरफटत नेलं. या अपघातात प्रदीप नाकवा हे थोडक्यात बचावले. मात्र कावेरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर कावेरी यांना तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी कावेरी नाकवा यांना मृत घोषित केलं. 

या प्रकरणात आरोपी असलेल्या मिहीर शाह हा फरार असून त्याचे वडील हे राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत. राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मिहीरचा शोध सुरू आहे. या प्रकरणात मिहीर सोबत असलेल्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Ganesh Idol Accident: स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, गणपतीची मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
Mumbai News: अनधिकृत ॲपआधारित वाहनांवर सरकारचा लगाम; कारवाईचा बडगा उगारताच 8 कंपन्यांचे परवान्यासाठी परिवहन विभागाकडे अर्ज
अनधिकृत ॲपआधारित वाहनांवर सरकारचा लगाम; कारवाईचा बडगा उगारताच 8 कंपन्यांचे परवान्यासाठी परिवहन विभागाकडे अर्ज
Palghar Hospital Row: पालघरमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल; थेट पोलीस अधीक्षकांनाच आज न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
पालघरमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल; थेट पोलीस अधीक्षकांनाच आज न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
Premnagarcha Maharaja Kurla Marathi News: मुंबईत आगमनावेळी आणखी एका गणेशमूर्तीचा अपघात; तातडीने तलावात विसर्जन, नेमकं काय घडलं?
मुंबईत आगमनावेळी आणखी एका गणेशमूर्तीचा अपघात; तातडीने तलावात विसर्जन, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
Maharashtra Live blog updates: मामाच्या गावावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा तलावात आढळला मृतदेह, गोंदियातील घटना
Maharashtra Live blog updates: मामाच्या गावावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा तलावात आढळला मृतदेह, गोंदियातील घटना
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Mumbai Ganesh Idol Accident: स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, गणपतीची मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Embed widget