Worli Milk Dairy: वरळी येथील दुग्धशाळा इतर ठिकाणी हलवण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने काढलेल्या जीआरनुसार, वरळी दुग्धशाळा गोरगाव येथील आरे कॉलनीत हलवण्यात येणार आहे. ही दुग्धशाळा आरे कॉलनीत स्थलांतरित करण्यासाठी एजन्सी नेमण्याचे आदेश दूध व्यवसाय आयुक्तांना दिले आहेत. 

Continues below advertisement


वरळी डेअरी सुमारे 14.5 एकरमध्ये पसरलेली आहे. यात दहा एकर जागा ही रिकामी आहे. तर 0.7 एकर जागेवर दुग्ध आयुक्त कार्यालयाच्या ताब्यात आहे. तसेच 0.9 एकरमध्ये वर्ग 3 कर्मचारी निवासस्थान असून 2.8 एकरमध्ये वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. येथून दुग्धशाळा इतर ठिकाणी हलवण्याच्या निर्णयानंतर येथील कर्मचारी निवासस्थानही स्थलांतरित करण्यात येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


यापूर्वी या जागेवर राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय उभारण्या निर्णय जाहीर केला होता. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाला चालना देण्यासाठी प्रयत्न केल्याचं समजत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 10 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला सोपवण्यात येणार नाही. 


दरम्यन, सुरुवातीला येथील रिकामी 10 एकर जागा पर्यटन विभागाकडे देण्याचा प्रस्ताव होता. मात्र गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुख्य सचिवांनी एका बैठकीत ही जागा राज्याच्या नगरविकास विभागाला देण्याचा निर्णय घेतला. दुग्धव्यवसाय विभाग ही जमीन महसूल विभागाकडे सुपूर्द करेल. जी त्यांच्याकडून नगरविकास विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर वरळी डेअरी विभागचे आरे कॉलनीत स्थलांतर करण्यात येईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :