Chandrakant Patil On CM Uddhav Thackeray : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला उद्धव ठाकरे यांची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान माणूस आहे. कशाचं सोयर सुतक नाही, काही काम नाही, पण त्यांना कुणी हलवू शकत नाही, असं पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले की, सगळे आमदार काम घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात. उद्या सामनामधून माझी खिल्ली उडवली जाईल. पण काळ तुम्हाला दाखवून देतील तुम्ही कुणाची खिल्ली उडवता, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
डायरी प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, डायरी सापडली का? त्यात काही सापडलं का? हे मला माहित नाही पण मला खूप काही दिसतं. भातखळकर यांनी केलेली मागणी योग्यच आहे. या चौकशीतून आता कुणी सुटणार नाही. संजय राऊत यांच्याकडून माझी सारखी चेष्टा केली जाते पण ती अंगावर येणार आहे, असं ते म्हणाले.
सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या वादावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमची सत्ता असताना आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची उभारणी केली. होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केला जाणार आहे. पण विरोधीपक्षनेते यांना देखील आमंत्रण नाही. शरद पवार येईपर्यंत जमावबंदी लावली आहे, त्यावेळी देखील जमावबंदी लावा ना, असं ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पोलीस दबाव टाकत आहेत, हे फार दिवस चालणार नाही. कोल्हापुरात देखील 8 वर्षांपूर्वीच्या केसेस काढल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी त्यांच्या बॅगा बांधून ठेवल्या आहेत. किरीट सोमय्या हे त्यांचे कर्दनकाळ ठरत आहेत, असंही ते म्हणाले.
अजित दादा तुम्ही श्रेय घ्या पण एसटी कामगारांचा संप मिटवा अशी मी चिठ्ठी लिहिली आहे. केवळ अजित दादाच हेच हा संप मिटवू शकतात, असं ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Charging Station : चांद्यापासून बांद्यापर्यंत पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार : अजित पवार