एक्स्प्लोर
यापुढे बीकेसीतील सरकारी कार्यालयात शिफ्टमध्ये काम!
मेट्रोच्या बांधकामासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याबाबत विचार सुरु आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो-2च्या कामामुळे आता सरकारी कार्यालयांमध्येही शिफ्ट सुरु होणार आहे. त्याची सुरुवात बीकेसीतील कार्यालयांमध्ये होईल.
प्रवाशांची गर्दी कमी करण्याकरिता रेल्वेकडून सातत्यानं कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव दिला जात आहे. मात्र, आता मेट्रोच्या बांधकामासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याबाबत विचार सुरु आहे.
राज्य सरकारबरोबरच कर्मचारी संघटनांकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयांमधील कर्मचारी वेगवेगळ्या वेळी कार्यालयात हजेरी लावणार आहेत.
मेट्रो-२ब चे वांद्रे-कुर्ला संकुलातील काम लवकरच सुरु होणार आहे. यामुळे या भागातील दोन मार्गिका पूर्णपणे बंद राहतील. परिणामी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून एमएमआरडीएनं वेळा बदलण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला आता हिरवा कंदील मिळला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement