एक्स्प्लोर
अंतर्वस्त्रातून 64,38,960 रुपयांचं सोनं घेऊन जाणाऱ्या महिलेला अटक

मुंबई : अंतर्वस्त्रांमध्ये तब्बल 64 लाखाहूंन अधिक किंमतीचं सोनं लपवणाऱ्या महिलेला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
ही महिला 2 किलो 160 ग्रॅम सोन्याचे बार घेऊन ही महिला जात होती. या सोन्याची किंमत 64 लाख, 38 हजार 960 रुपये आहे. कस्टम विभागाला महिलेचा संशय आल्यानंतर त्यांनी चौकशी करुन तिला अटक केली.
विमानतळावर सोनं जप्त होण्याची तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे. शनिवारी 51.36 लाख किंमतीचं 1.63 किलो सोनं पुणे विमानतळावर जप्त करण्यात आलं होतं. संबंधित व्यक्ती अबू धाबीहून पुण्याला आला होता.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























