एक्स्प्लोर
42 वर्षीय महिलेची कमाल, चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली खेचलं!
![42 वर्षीय महिलेची कमाल, चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली खेचलं! Woman Takes On Snatcher Throws Him Off Bike 42 वर्षीय महिलेची कमाल, चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली खेचलं!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/05103347/Chain_snatchers1829-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: कामावरुन घरी परतणाऱ्या एका महिलेनं हिंमतीचं एक असं उदाहरण दाखवून दिलं की, ज्यानं मुंबई पोलिसही प्रभावित झाले आहेत. निर्मनुष्य रस्त्यावर साखळी चोरांनी हल्ला केल्यानंतरही महिलेनं हिंमत न हरता स्वत:ला वाचवित चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली पाडलं. त्यानंतर पोहचलेल्या पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
इंग्रजी वृत्तपत्र मिड-डेच्या वृत्तानुसार, कॉल सेंटरमध्ये काम करणारी 42 वर्षीय महिला शुक्रवारी सकाळी जवळजवळ 3 वाजून 45 मिनिटांनी ऑफिसहून निघाली. तिनं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कांदिवली पूर्वला जाण्यासाठी रिक्षा थांबवली. रिक्षा काही अंतर दूर जाताच एक स्कूटी थेट रिक्षाच्या समोरच येऊन उभी राहिली.
रिक्षाचा वेग कमी होताच बाइकवरील आरोपींनी महिलेची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने हिंमत सोडली नाही आणि आपली पर्स घट्ट पकडून ठेवली. त्यानंतर तिनं स्कूटीवरील त्या आरोपीला एवढ्या जोरात खेचलं की, तो थेट खालीच पडला. घटनास्थळापासून काही अंतर दूर असलेल्या गस्तीवरील पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत आरोपीला अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)