एक्स्प्लोर
डोंबिवलीत सासूकडून जावयाची गळा दाबून हत्या
जावई जबरदस्तीने त्याची जुळी मुलं घेऊन गेल्याच्या रागातून सासूने जावयाची गळा दाबून हत्या केल्याची घटना काल रात्री डोंबिवलीत घडली. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत खूनी सासूला बेड्या ठोकल्या आहेत.

फाईल फोटो
डोंबिवली : जावई जबरदस्तीने त्याची जुळी मुलं घेऊन गेल्याच्या रागातून सासूने जावयाची गळा दाबून हत्या केल्याची घटना काल रात्री डोंबिवलीत घडली. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत खूनी सासूला बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेच्या ठाकुरवाडी फुलेनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या 25 वर्षीय रवी सोलंकी याचं मुंब्रा इथं राहणाऱ्या सोनाबाई वळंदे हिच्याशी लग्न झालं होतं. सोनाबाई बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. तिला जुळी मुलं होऊन चार महिने उलटले तरी बायको सासरी येत नव्हती. त्यामुळे वैतागलेल्या रवीनं सासरी जाऊन मुलांना जबरदस्तीनं उचलून घरी आणलं. या सर्व प्रकाराचा जाब विचारण्यासाठी त्याची सासू अनिता वळंदे काल रात्री रवीच्या घरी आली आणि त्याला मारहाण केली. यात त्याचा गळा दाबण्यात आल्यानं त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी अनिताला अटक केली आहे.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















