एक्स्प्लोर
लोकलमध्ये महिलेला मित्राची मारहाण
महिलेच्या मित्रानं रेल्वेच्या डब्यातच महिलेला धक्काबुक्की केली.
मुंबई: मुंबई लोकलच्या डब्यात झालेल्या मित्र मैत्रिणीच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. काल रात्री 11 वाजता ही महिला लोकलनं ठाण्याहून आपल्या मित्रासह सीएसएमटीच्या दिशेने जात होती. याच दरम्यान काही कारणाहून या दोघांमध्ये वादावादी झाली आणि त्याचं रुपांतर भांडणात झालं.
महिलेच्या मित्रानं रेल्वेच्या डब्यातच महिलेला धक्काबुक्की केली. अपंगांच्या डब्ब्यात हा प्रकार झाल्याचं समजतंय.
विशेष म्हणजे हे भांडण सुरु असताना रेल्वेतल्या कोणत्याही प्रवाशानं मध्यस्थी केली नाही. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वेची चेन खेचण्याचा पर्याय असतो, मात्र तसं कुणी केलं नाही.
एवढंच काय तर शेजारच्या डब्यातला सुरक्षा रक्षकानंही हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र प्रवाशांनी याची माहिती पोलिसांनी दिली.
या सगळ्या प्रकरणानंतर दादर स्टेशनला या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर मारहाणीचा, विनयभंग आणि हत्येच्या प्रयत्न असा गुन्हा दाखल केला आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement