एक्स्प्लोर
Advertisement
PMC Bank Scam | खातेदारांना दिलासा, आता अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार!
पीएमसी बँकेचे सुमारे 17 लाख खातेदार आहेत, तर बँकेवर 11 हजार 500 कोटी रुपयांचं आर्थिक संकट आहे. बँकेत अनेकांची लाखो रुपयांची एफडी, सॅलरी अकाऊंट आहेत.
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँक खातेदारांना आता 40 हजारांशिवाय अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार आहे. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. निकडीचा प्रसंगाच्या वेळीच ही 50 हजार रुपयांची रक्कम काढता येऊ शकेल.
पीएमसी बँकेचे सुमारे 17 लाख खातेदार आहेत, तर बँकेवर 11 हजार 500 कोटी रुपयांचं आर्थिक संकट आहे. बँकेत अनेकांची लाखो रुपयांची एफडी, सॅलरी अकाऊंट आहेत.
कोणत्या परिस्थितीत पैसे काढता येणार?
किरीट सोमय्या यांच्या ट्वीटनुसार, शिक्षण, आजारपण, यांसारख्या अत्यावश्यक गरजेसाठी पीएमसी बँकेचे खातेदार आता अतिरिक्त 50 हजार रुपए काढू शकतात. पैसे काढण्यासाठी खातेदारांना त्यांना बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागेल. मेडिकल इमर्जन्सीसाठी खातेदारांना डॉक्टरने दिलेल्या अंदाजित खर्चाची माहिती द्यावी लागेल. मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल रिपोर्ट आणि उपचारांचं बिलही बँकेत जमा करावं लागलं.
पैसे काढण्याची मर्यादा किती वेळा वाढवली? सर्वात आधी आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा केवळ 1000 रुपये निश्चित केली होती. त्यानंतर ती वाढवून 10,000 रुपये करण्यात आली होती. मग आरबीआयने 3 ऑक्टोबर रोजी बँक ग्राहकांना आपल्या खात्यातील जमा रकमेपैकी 25,000 हजार रुपये काढण्याची परवानगी दिली. यानंतर खातेदारांनी जोरदार गोंधळ घालत निषेध व्यक्त केल्याने आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आणि ती 40 हजार रुपये केली. खातेदारांचा पैसा सुरक्षित : आरबीआय दरम्यान, बँकेच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित आहे. 30 ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत खातेदारांना निर्णयाची माहिती देण्यात येईल, असं आरबीआयने सांगितलं. यानंतर मुंबईतल्या आझाद मैदानात सुरु असलेलं पीएमसी खातेदारांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. संबंधित बातम्या#PMCBank now ₹50,000 withdrawal (in addition to ₹40,000) allowed for medical/education urgency. needy person has to apply to their branch
पी एम् सी बैंक खातेदार आता मेडिकल/शिक्षण इमरजेंसी साठी अधिक ₹५०,००० त्यांचा खात्यात्तुन काढू शकणार @BJP4Maharashtra — Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 23, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement