एक्स्प्लोर

ठाण्यासह, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदरमध्ये लॉकडाऊन सुरु, का करावा लागला लॉकडाऊन?

ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर आणि पनवेल या ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेत पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामागचं कारण आहे तिथला महिन्याभरात वाढलेला पॉझिटिव्हीटी रेट.

मुंबई : ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर आणि पनवेल या ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेत पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामागचं कारण आहे तिथला महिन्याभरात वाढलेला पॉझिटिव्हीटी रेट. राज्यात सर्वाधिक, 31 टक्के पॉझिटिव्हीटी रेट ठाण्यात आहे, तर मुंबईचा 25 % आणि एकूण राज्यातला पॉझिटिव्हीटी रेट 19% इतका आहे. 27 मे पर्यंत ठाण्यात 20 टक्के  पॉझिटिव्हीटी रेट होता, तर 28 जूनला हा आकडा 31 टक्क्यांवर पोहचला. मागच्या महिन्याभराच्या आकडेवारीनुसार ठाण्यात 11 टक्क्यांनी पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. म्हणजे जवळपास तीनपैकी एक नमुना पॉझिटिव्ह येत असल्याचं या आकड्यांमधून स्पष्ट होतंय. एकूण केलेल्या कोरोना चाचण्यांमधून पॉझिटिव्ह आढळून येत असल्येल्या लोकांची संख्या म्हणजे पॉझिटिव्हीटी रेट. महापालिका अधिकाऱ्यांकडून सध्या या हेल्थ मॅट्रिकचा वाढत्या कोरोना रुग्ण संख्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण - डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये उद्यापासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन तर पनवेलमध्ये 3 ते 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय तिथल्या महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबईत 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू! जमावबंदीसह नाईट कर्फ्यू पालघर आणि पनवेलमध्ये संख्या जास्त तसेच मुंबई महानगरातील अन्य दोन क्षेत्र, रायगड आणि पालघर मध्येही कोरोनासाठी पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. पनवेल महानगरपालिकेत समावेश असलेल्या रायगडमध्ये 24 टक्के आहे, जो मागील महिन्यात 15 टक्के  होता. तर वसई - विरार महानगरपालिकेचा समावेश असलेल्या पालघर मध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे 29 टक्के  रेट आहे, जो मागच्या महिन्यात 16 टक्के  होता. मुंबईचा पॉझिटिव्ह रेट हा मागच्या महिन्यापासून 25 टक्क्यांवर स्थिरावल्याची समानधानकारक बाब समोर आली आहे. त्यामुळे तुम्हाला जर लॉकडाऊन पुन्हा नको असेल तर सरकारी मार्गदर्शक सुचनांचं पालन करा, अनावश्यक बाहेर फिरणं टाळा आणि तुमच्या शहर किंवा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडून पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्यात प्रशासनाला मदत करा असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. कुठल्या जिल्ह्यात वाढत आहेत पॉझिटिव्हीटी रेट ? 28 जून / 27 मेची तुलनात्मक आकडेवारी ठाणे --31 टक्के  / 20 टक्के पालघर --29टक्के /16टक्के मुंबई --25टक्के / 25टक्के रायगड --24टक्के  /15टक्के औरंगाबाद --22टक्के  /12टक्के जळगाव --18टक्के /9टक्के नाशिक --16टक्के  /10टक्के धुळे --16टक्के  /5टक्के अकोला --15टक्के  /10टक्के सोलापूर --15टक्के  /10टक्के राज्यातील एकूण रेट : 19% /15%
ठाण्यात लॉकडाऊन सुरू
ठाण्यात आज सकाळी सात वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. ठाणेकर देखील लॉकडाऊन पाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाण्यााातील वागळे इस्टेट, आनंद नगर, कोळीवाडा, चिंतामणी चौक या परिसरात तुरळक गर्दी दिसून आली. तसेच भाजीपाला आणि धान्य मार्केट जरी सुरू असले तरी ठाणेकर मात्र याकडे फिरकलेले नाहीत. जांभळी नाका येथील भाजीपाला मार्केट सकाळी 6 ते 11 सुरू ठेवण्याची परवानगी आहे तर धान्य मार्केट सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहील. या दोन्ही बाजारपेठा बंद राहतील असे आधी सांगण्यात आले होते. मात्र आता ते देखील सुरू करण्याची परवानगी दिली गेलीय.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊनला सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व चारचाकी आणि दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. गरज असणाऱ्या वाहनांना कल्याण-डोंबिवलीच्या हद्दीत सोडलं जात आहे. कल्याण-डोंबिवलीच्या सर्व एन्ट्री पॉईंट वर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
Devendra Fadnavis : राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget