एक्स्प्लोर
Advertisement
धर्मा पाटील यांच्यावेळी भाजप नेत्यांना पाझर का फुटला नाही; सुशांत सिंह प्रकणावरुन अनिल गोटेंची टीका
सुशांत सिंह प्रकरणामुळे भाजप नेत्यांना झोप येत नसल्याची खोचत टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. यावेळी धर्मा पाटील यांच्यावेळी भाजप नेत्यांना पाझर का फुटला नाही, असा प्रश्नही गोटे यांनी उपस्थित केलाय.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या हत्येची अथवा आत्महत्येच्या घटनेने भाजप नेत्यांना झोप येत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच भाजप नेते रात्रंदिवस सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अस्वस्थ झाले आहेत, अशी सहृदयता अनन्यसाधारण आहे. सुशांत सिंह बिहार राज्यातील निवासी आहे. त्यांच्या पालकांनी त्याला राज्यातील भाजप नेत्यांच्या विश्वासावरच मुंबईत पाठवले होते. आपल्या पालकत्वाच्या कर्तव्यात कसूर होता कामा नये यासाठी सुरू असलेली घालमेल अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शांत व्हायला हरकत नाही, अशी खोचक टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
मी आपला साधा भोळा शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे तेवढ्याच जगाच्या मर्यादित प्रश्न उभे राहतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना आमच्या जिल्ह्यातील धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यांने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी भाजप नेत्यांना पाझर फुटला नाही. धर्मा पाटिल यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? याचा शोध घेण्यासाठी सुशांत सिंहच्या प्रकरणी आकाश पाताळ एकत्र करणाऱ्यांनी नेमके काय प्रयत्न केले होते? असा अत्यंत बाळबोध प्रश्न मला पडला आहे. शेतकऱ्याने आपल्या कार्यालयात आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांना आपण शोधून काढले का? की बिचाऱ्या शेतकर्यांच्या प्राणास काहीच किंमत नाही. कारण त्यांना आत्महत्या करण्याची पाळी आणायला भाग पाडणारे आपल्या मंत्री मंडळातील सहकारी होते म्हणून आपण डोळ्यावर भाजपने सोडलेल्या सांडाचे कातडे पांघरून घेतले होते का? आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यचे भांडवल करणे यालाच तर म्हणतात ना प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारा?, असा प्रश्नही अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.
गुन्हेगारांना आता परदेशात पळून जाण्याची गरज वाटणार नाही; सुशांत सिंह प्रकरणावरुन ॲड. उज्ज्वल निकम यांचे वक्तव्य
सी.बी.आय. हे विरोधकांना छळण्यासाठी
सी.बी.आय. हे विरोधकांना छळण्यासाठी सरकारच्या हातातले बाहुले आहे. असे तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणत होते. आज काही वेगळी परिस्थिती आहे का? हे पण राज्यातील जनतेला कळाले पाहिजे. गेल्या सहा वर्षांपासून नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास सुरु आहे. अजून तरी कुणा निश्चित व्यक्ती पर्यंत किंवा लॉजिकल एन्ड पर्यंत तपास पोहोचलेला नाही. सी.बी.आय. असल्याने नेमके काय सुरु आहे तेही बाहेर येण्याची शक्यता नाही. अपेक्षा एवढीच की सुशांत सिंह राजपूत याचे प्रकरण ताकात बुडवलेल्या केळ्या सारखे होवू नये, असे अनिल गोटे शेवटी म्हणाले.
CBI Probe in SSR Case | सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयकडून तपास सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement