Who Is Rajan Teli : 19 वर्षांनी घरवापसी! ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे कोण आहेत राजन तेली?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या तयार करत आहेत.
Who is Rajan Teli : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या तयार करत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (BJP) महाराष्ट्राच्या किनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते राजन तेली यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजन तेली यांनी शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला.
कोण आहेत राजन तेली?
राजन तेली यांचा जन्म 25/06/1970 साली कुडाळ तालुक्यातील घोडगे या गावात झाला. 1985 साली त्यांनी कणकवली येथील महाविद्यालयातच विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व केले.
- 1988 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये शिवसेना शाखाप्रमुख पद.
- 1991 साली त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.
- 1995 साली त्यांनी जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषविले.
- 1997 साली त्याच्यावर कोकण सिंचन महामंडळाची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी.
- 2005 साली राणे समवेत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तर राणे समवेत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश.
- 2007 साली विधान परिषद आमदार.
- 2012 साली सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी बँकेचा चेअरमन.
- 2016 साली राजन तेली यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी देत राज्य सचिव पद दिलं.
2014 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक दीपक केसरकर यांनी शिवसेनेकडून लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला होता. दीपक केसरकर यांना 70902 मते मिळाली, तर राजन तेली यांना 29710 मते मिळाली. 41 हजारांहून अधिक मताधिक्याने केसरकर विधानसभेवर सलग दुसऱ्यांदा निवडून गेले होते.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा व शिवसेनेची युती होती. युतीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली. केसकरांना 69784 मते मिळाली, तर तेली यांना 56556 मते मिळाली. केसरकर यांना 13 हजार मतांची आघाडी मिळाली. सावंतवाडीतून ते सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
विद्यामान आमदार दिपक केसरकर यांच्या समोर राजन तेलींचे कडवे आव्हान असेल अपक्ष म्हणून निवडणूक लढविली तेव्हा तेलींनी केसरकरांना कडवी झुंज दिली होती. मागील अनेक वर्ष ते सावंतवाडी मतदार संघात ठाण मांडून आहेत अनेक कार्यकर्ते त्यांच्या समवेत असल्याने केसरकरांना येत्या विधानसभा निवडणुकीत तेलींचे कडवे आव्हान असेल.
हे ही वाचा -