एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हाट्सअॅप चॅट करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, अपहरण करून मागितली खंडणी
भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथे राहणारा मोहम्मद शकील खान हा एका कंपनीत नोकरीला आहे. घरी न परतल्याने पत्नी आस्मा हिने नारपोली पोलिसांकडे पती हरवल्याची खबर दिली.
मुंबई : जर तुम्ही व्हाट्सअॅप वर चॅट करत असाल तर सावधान तुमची फसवणूक होऊ शकते. भिवंडीतील एका तरुणाची व्हाट्सअॅप वर चॅट करून फसवणूक करण्यात आली आहे. अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात नारपोली पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या तावडीतून तीन दिवस बंदी बनून ठेवलेल्या मोहम्मद शकील खान या इसमाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथे राहणारा मोहम्मद शकील खान हा एका कंपनीत नोकरीला आहे. घरी न परतल्याने पत्नी आस्मा हिने नारपोली पोलिसांकडे पती हरवल्याची खबर दिली. परंतु त्यानंतर पत्नीच्या मोबाईल वर फोन करून आपणास डांबून ठेवले असून सुटकेसाठी 15 लाखांची मागणी करीत असल्याचा फोन कॉल पती शकील याने केला. पत्नीने पुन्हा नारपोली पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली असता पोलिसांनी भादवी कलम 364 ( अ ) ,387,120 ( ब ) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा नोंदवून नारपोली पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अंबरनाथ येथील वस्सीउल्लाह सिताबुल्ला खान यास ताब्यात घेतले. खान याने शगिर आणि त्यांच्या साथीदारांनी अंबरनाथ येथील एक बंद गाळ्यात शटरला कुलूप लावून डांबून ठेवल्याची माहिती दिली. पोलीस पथकाने स्थानिक अग्निशामक दलाच्या मदतीने शटर उघडून मोहम्मद शकील खान या अपहरण झालेल्या व्यक्तीची सोडवणूक केली.
Irrigation Scam | सिंचन घोटाळ्याप्रकरणी दहा आजी-माजी अधिकाऱ्यांवर गुन्हा | ABP Majha
या नंतर पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मुख्य सूत्रधार आरोपीच नाव शगिर अब्दुल रहमान चौधरी असे आहे. लवकर पैसे कमवण्यासाठी शगिर चौधरी याने आपल्या मित्रांशी संगनमत करून शकील सोबत व्हाट्सअॅपवर चॅटिंग करण्यास सुरुवात केली. आठ महिन्यापासून सुरू होती. ज्यावेळी परस्पर भेटण्याची वेळ आली त्यावेळी शगिरने एका बनावट महिलेची हिची मदत घेतली. भेटीला आल्यानंतर अगोदरच पाळत ठेवून असलेल्या आरोपींनी शकीलचे अपहरण केले.
याप्रकरणी नारपोली पोलिसांनी शगीर अब्दुल रेहमान चौधरी ( वय 24 रा . उल्हासनगर ), वसीम इसरार खान ( वय 22 रा. ग्रीनपार्क पुणे ) , अब्दुल कलाम अब्दुल सलाम खान ( वय 22 वर्ष रा . उल्हासनगर ), वसीउल्लाह सीताबुल्ला खान ( वय 22 रा . अंबरनाथ ), आणि महिला स्वाती सीताराम माळी ( वय 27 , रा . उल्हासनगर ) पाच जणांना अटक केली असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर सलमान ( रा . कोंढवा , पुणे ) हा फरार झाला आहे त्याचा शोध नारपोली पोलीस घेत असून या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी देखील नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहान केले आहे.
संबंधित बातम्या :
चित्रपट पाहून गाडीसाठी मित्राचे अपहरण करुन हत्या
गोव्यात चित्रपट शूट करायचाय, तर आधी सरकारला सिनेमाची स्टोरी सांगा!
अखेर उर्वशी चुडावाला आझाद मैदान पोलीस स्टेशनला हजर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
Advertisement